मराठी बातम्या /बातम्या /विदेश /TIKTOK खरेदी करण्यासाठी ट्रम्प यांनी मायक्रोसॉफ्टवर आणला होता दबाव, CEO नडेलांचा गौप्यस्फोट

TIKTOK खरेदी करण्यासाठी ट्रम्प यांनी मायक्रोसॉफ्टवर आणला होता दबाव, CEO नडेलांचा गौप्यस्फोट

TIKTOK खरेदी करण्यासाठी अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्यावर दबाव आणला होता, असा गौप्यस्फोट मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्य नडेला यांनी केला आहे.

TIKTOK खरेदी करण्यासाठी अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्यावर दबाव आणला होता, असा गौप्यस्फोट मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्य नडेला यांनी केला आहे.

TIKTOK खरेदी करण्यासाठी अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्यावर दबाव आणला होता, असा गौप्यस्फोट मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्य नडेला यांनी केला आहे.

कॅलिफोर्निया, 29 सप्टेंबर : TIKTOK खरेदी करण्यासाठी अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump puts pressure for buying TIKTOK company says Microsoft CEO) यांनी आपल्यावर दबाव आणला होता, असा गौप्यस्फोट मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्य नडेला यांनी केला आहे. नडेला यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या आक्षेपार्ह कार्यशैलीबाबत (Donald Trump's objectionable work style) पहिल्यांदाच जाहीर भाष्य केलं आहे. सुरुवातीला आपल्या कंपनीकडे आलेला प्रस्ताव, त्यानंतर ट्रम्प यांची मध्यस्थी, मग दुसऱ्या कंपनीने परस्पर दिलेला प्रस्ताव या सगळ्या संशयास्पद बाबींचा नडेला यांनी पर्दाफाश केला आहे.

काय म्हणाले नडेला?

मायक्रोसॉफ्ट कंपनीचे सीईओ सत्य नडेला यांनी कॅलिफोर्नियात आयोजित एका संमलेनात ट्रम्प यांच्यावर आरोप केले आहेत. टिकटॉक खरेदी करण्यासाठी ट्रम्प यांनी आपल्या कंपनीवर दबाव आणला होता. टिकटॉकच्या आडून चीनी कंपनी गोळा अमेरिकन नागरिकांचा डेटा गोळा करत असल्याबद्दल ट्रम्प यांना आक्षेप होता. त्यासाठी अमेरिकेतून ही सेवा बॅन करण्याच्या ते विचारात होते. त्यानंतर त्यांनी टिकटॉक कंपनी खरेदी करावी, यासाठी मायक्रोसॉफ्टवर दबाव टाकायला सुरुवात केली होती.

टिकटॉक चालवणाऱ्या बाईटडान्स कंपनीच्या सीईओंनी मायक्रोसॉफ्टशी संपर्क साधला होता. आम्ही त्यांच्याकडे गेलो नव्हतो. मात्र तरीही एक दिवस अचानक ओरॅकल नावाच्या कंपनीसोबत टिकटॉकचा व्यवहार झाल्याची बातमी आली. ओरॅकलने दिलेल्या ऑफरनंतर टिकटॉकने मायक्रोसॉफ्टशी सुरु असणारी बोलणी अचानक थांबवली आणि हा व्यवहार पार पडला. यामागे डोनाल्ड ट्रम्प यांचा हात होता, असा संशय नडेला यांनी व्यक्त केला आहे.

हे वाचा - पाकिस्तान धोकेबाज, भारतानं थेट आमच्याशी बोलावं; तालिबानचं आवाहन

राष्ट्रीय सुरक्षेची तडजोड

ट्रम्प यांनी स्वतःचा अजेंडा रेटण्यासाठी मायक्रोसॉफ्ट आणि इतर कंपन्यांना वापर करून घेतल्याचं नडेला यांचं म्हणणं आहे. राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्याचा बाऊ करून वैयक्तिक अजेंडा रेटण्याच्या वृत्तीवर त्यांनी सडकून टीका केली आहे. या आरोपाला आता ट्रम्प यांच्याकडून काय प्रत्युत्तर येतं, ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

First published:
top videos

    Tags: Donald Trump, Microsoft, Tiktok