Home /News /videsh /

डोनाल्ड ट्रम्प यांना सर्दी, ताप आणि श्वास घेण्याचा त्रास, रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी पोस्ट केला VIDEO

डोनाल्ड ट्रम्प यांना सर्दी, ताप आणि श्वास घेण्याचा त्रास, रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी पोस्ट केला VIDEO

अमेरिकेचे राष्ट्राध्य डोनाल्ड ट्रम्प यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.

    वॉशिंग्टन, 03 ऑक्टोबर: अमेरिकेचे राष्ट्राध्य डोनाल्ड ट्रम्प यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यांना शुक्रवारी (2 ऑक्टोबर 20) ला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या त्यांच्यावर प्रायोगिक उपचार सुरू आहेत. त्यानंतरही ट्रम्प यांनी आपली तब्येत ठीक असल्याचं म्हटलं आहे. अमेरिकेत सध्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच ट्रम्प यांना रुग्णालयात दाखल व्हावं लागलं आहे. फर्स्ट लेडी मेलानिया ट्रम्प यांनाही कोरनोनाची बाधा झाली आहे. शुक्रवारी ट्रम्प सर्वांसमोर आले आणि संध्याकाळी मास्क घालून ते व्हाइट हाउसच्या बाहेर पडले आणि वॉल्टर रिव्हर लष्री रुग्णलयाच्या दाखल होण्यासाठी रवाना झाले. व्हिडीओ पोस्ट करून ट्रम्प यांनी स्वत: दिली माहिती ट्रम्प यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट करून आपल्याला रुग्णालयात दाखल करण्यात येत असल्याची माहिती सर्व जगाला दिली. हा 18 सेकंदांचा व्हिडिओ व्हाइट हाउसमध्येच रेकॉर्ड करण्यात आला होता. ‘पुढचे काही दिवस वॉल्टर रीड रुग्णालयातील अध्यक्षांच्या ऑफिसमधून ट्रम्प यांनी काम करावं,’ असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिल्याची माहिती प्रेस सचिव कायले मैकनेनी यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. आगामी काही दिवस अध्यक्ष ट्रम्प हे वॉशिंग्टनच्या बाहेर असलेल्या लष्कराच्या एका रुग्णालयात राहतील, अशी माहिती व्हाइट हाउसने शुक्रवारी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली. ते रुग्णालयातून आपली कामं करतील. डोनाल्ड ट्रम्प यांना कोविड-19 वरील उपचारांसाठीच रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांचे डॉक्टर आणि वैद्यकीय विशेषज्ज्ञांच्या सल्ल्यानंतरच हा निर्णय घेण्यात आला आहे, असंही या पत्रकात म्हटलं आहे. हे वाचा-LIVE : काँग्रेस खासदार राहुल गांधी आज पुन्हा हाथरसला जाणार ट्रम्प यांचे निवडणूक प्रचार कार्यक्रम रद्द होणार? नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रचाराचे कार्यक्रम तात्पुरतं थांबवलं जाईल किंवा हे कार्यक्रम डिजिटल स्वरूपात घेतले जातील असं त्यांच्या निवडणूक प्रचार मॅनेजर बिल स्टिफन यांनी शुक्रवारीच स्पष्ट केलं होतं. त्यांना कोरोनाची बाधा झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. त्यांचा निवडणूक प्रचार मॅनेजर बिल स्टिफन म्हणाले, ‘ निवडणूक अभियानातील ज्या कार्यक्रमात ट्रम्प स्वत: हजर राहणार होते ते सगळे आता व्हर्च्युअली केले जातील किंवा रद्दही केले जातील.’ हे वाचा-दलित महिलेसोबत सामूहिक बलात्कार, पोलिसांनी दाखल केलं नाही FIR म्हणून आत्महत्या मेलेनियांचे कार्यक्रम रद्द स्टिफन पुढे म्हणाले, ‘मेलेनिया ट्रम्प यांच्याशी संबंधित सर्व कार्यक्रमही रद्द करण्यात आले आहेत. या अभियानातील विविध कार्यक्रमांबाबत आम्ही एकेक करून निर्णय घेत आहोत आणि येत्या काही दिवसांत आम्ही त्याबद्दल माहिती देऊ.’ उपाध्यक्ष माइक पेंस निवडणूक प्रचार सुरू ठेवणार आहेत. मी आणि फर्स्ट लेडी मेलेनिया यांचे कोरोनाचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत, असं शुक्रवारी ट्रम्प यांनी सांगितलं होतं. ‘माझी आणि मेलेनियाची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याचं आज रात्री आम्हाला कळालं. आम्ही लवकरच क्वारंटाइन होऊ.’
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Donald Trump

    पुढील बातम्या