Home /News /national /

दलित महिलेसोबत सामूहिक बलात्कार, पोलिसांनी दाखल केलं नाही FIR म्हणून केली आत्महत्या

दलित महिलेसोबत सामूहिक बलात्कार, पोलिसांनी दाखल केलं नाही FIR म्हणून केली आत्महत्या

पोलिसांनी तक्रार दाखल करून न घेतल्यामुळे पीडितेनं अखेर गळफास घेऊन आत्महत्या केली. मध्य प्रदेशातील नरसिंगपूरच्या चिचली गावात ही धक्कादायक घटना समोर आली आहे.

    भोपाळ, 03 ऑक्टोबर : हाथरसमधील सामूहिक बलात्काराच्या प्रकरणामुळे आधीच संताापाची लाट उसळलेली असताना आणखीन एक माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. दलित मुलीवर सामूहिक बलात्कार झालेल्याची तक्रार दाखल करून घेण्यास पोलिसांनी नकार दिल्यामुळे महिलेनं धक्कादायक पाऊल उचललं आहे. या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर पीडित महिला आपल्या पतीसह तक्रार करण्यासाठी पोलीस ठाण्यात गेली मात्र चार दिवस त्यांना न्याय मिळाला नाही. पोलिसांनी तक्रार दाखल करून न घेतल्यामुळे पीडितेनं अखेर गळफास घेऊन आत्महत्या केली. मध्य प्रदेशातील नरसिंगपूरच्या चिचली गावात ही धक्कादायक घटना समोर आली आहे. धक्कादायक! काँग्रेस-भाजपच्या महिला नेत्या चालवित होत्या सेक्स रॅकेट चार दिवसांपासून आम्ही न्याय मिळवण्यासाठी पोलीस ठाण्याच्या खेपा घातल होतो मात्र पोलिसांनी FIR दाखल करून घेतला नाही असा आरोप पीडितेच्या पतीनं केला आहे. दरम्यान हे प्रकरण भोपाळपर्यंत पोहोचल्यानंतर मुख्यमंत्री शिवराज सिंह यांनी स्वत: या प्रकरणाची दखल घेतली असून कठोर कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत. हाथरस : राहुल-प्रियांका गांधींसह 200 जणांविरोधात FIR दाखल मुख्यमंत्री शिवराज सिंह यांच्या आदेशानंतर पोलिसांनी पीडितेच्या पतीची तक्रार दाखल केली आणि त्यानंतर चौकशी करून तीन आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. कलम 376 D आणि 306 अंतर्गत या तीन आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पीडितेची तक्रार लिहून न घेणाऱ्या पोलीस प्रभारीविरोधात कारवाई करण्यात आली आहे. पोलीस ठाण्यातील एसपीला सध्या सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं आहे.
    First published:

    Tags: Dalit, Gang Rape

    पुढील बातम्या