कराची, 17 जानेवारी : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमने पाकिस्तानमध्ये दुसरं लग्न केलं आहे. तर पहिली पत्नी महजबीन हिला तलाक दिला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महजबीन सध्या दाऊद इब्राहिमसोबतच राहतेय. दाऊद इब्राहिमची दुसरी पत्नी पाकिस्तानी असून पठाण आहे. याशिवाय दाऊदने पाकिस्तानमधील आपला पत्ताही बदलल्याचं म्हटलं जातंय. पाकिस्तानी लष्कर आणि गुप्तचर संस्था आयएसआयने दाऊदचं वास्तव्याचं ठिकाण बदललं आहे. सुरक्षेच्या कारणास्तव कराची शहरातच दाऊदला दुसऱ्या जागी हलवण्यात आलं आहे.
दाऊदची बहीण हसीना पारकरचा मुलगा अली शाहने खुलासा केला की, दाऊदने पाकिस्तानी महिलेशी लग्न केलं आहे. राष्ट्रीय तपास संस्थेला दिलेल्या जबाबात त्याने हा खुलासा केलाय. दाऊदची बहीण हसीना पारकरचा मुलगा अली शाहने सप्टेंबर २०२२ मध्ये राष्ट्रीय तपास संस्थेसमोर जबाब नोंदवला होता.
हेही वाचा : 26/11 हल्याचा मास्टरमाईंड अब्दुल मक्की अखेर दहशतवादी म्हणून घोषित, भारताला मोठे यश
दाऊदची बहीण हसीना पारकरचा मुलगा शाहने दिलेल्या माहितीनुसार दाऊदचं दुसरं लग्न हे महजबीनवरून तपास यंत्रणांचे लक्ष वळवण्यासाठीचा प्रयत्नही असू शकतं. राष्ट्रीय तपास संस्थेने अनेक ठिकाणी छापा टाकला होता. दाऊद इब्राहिमच्या दहशतवादी नेटवर्क प्रकरणी शेकडो लोकांना अटक करण्यात आली होती. एनआयएने या प्रकरणी न्यायालयात आरोपपत्रही दाखल केलं होतं.
अली शायने एनआयएला सांगितले की, दाऊदच्या पहिल्या पत्नीला जुलै २०२२ मध्ये दुबईत भेटला होता. तिथे त्याला दाऊदच्या दुसऱ्या लग्नाबद्दल माहिती मिळाली होती. महजबीन शेख व्हॉटसअॅप कॉलच्या माध्यमातून भारतातील दाऊदच्या नातेवाईकांसोबत संपर्कात असते. याशिवाय दाऊद इब्राहिम अजुनही कराचीत राहतो पण त्याला शहरात दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आलं असल्याचंही अली शाहने सांगितलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Dawood ibrahim