बीजिंग, 09 जून : एकिकडे माणसं प्राण्यांना क्रुरतेने वागणूक देत असल्याच्या घटना समोर आहेत, तर दुसरीकडे प्राण्यांमध्ये माणसांप्रती असणाऱ्या भावना पाहून माणसांनाही आपण माणूस असल्याची शरम वाटेल. सध्या चीनमधील (china) एका कुत्र्याने (dog) सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. आपल्या मालकाने आत्महत्या केल्यानंतर हा कुत्रा आपल्या मालकाची प्रतीक्षा करत राहिला.
चीनच्या वुहानमधील (wuhan) या कुत्र्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. या कुत्र्याच्या मालकाने नदीत उडी मारून आत्महत्या केली. त्यानंतर 4 दिवस हा कुत्र्या त्या पुलावर त्याच ठिकाणी आपल्या मालकाची वाट पाहत बसला.
डेली मेलच्या वृत्तानुसार, 30 मे रोजी एक व्यक्ती आपल्या कुत्र्यासह घराबाहेर पडला. त्यानंतर या व्यक्तीने यांगात्जे नदीच्या पुलावरून उडी मारून आत्महत्या केली.
हे वाचा - गर्दीतही ओळखणार कोरोना रुग्ण; IIT च्या माजी विद्यार्थ्यांनी तयार केलं खास उपकरण
वुहान स्मॉल अॅनिमल प्रोटेक्शन असोसिएशनचे संचालक डू फॅन यांनी सांगितलं, "आम्ही घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यामध्ये एका व्यक्तीने पुलावरून नदीत उडी मारल्याचं आम्हाला दिसलं. तेव्हापासून हा कुत्रा तिथंच आहे"
या कुत्र्याला दत्तक घेऊन कित्येक लोकांनी आपल्या घरी घेऊन जाण्याचा प्रयत्न केला मात्र तो जाण्यासाठी तयार नाही.
हे वाचा - कोरोनाविरोधी भारतीयांना मिळाली ताकद; 30% संक्रमित उपचारविनाच बरे झाले?
काही दिवसांपूर्वीच वुहानमध्येच एक कुत्रा रुग्णालयाबाहेर आपल्या मालकाची वाट पाहत असल्याची घटना समोर आली होती. फेब्रुवारी महिन्यात या कुत्र्याचा मालक रुग्णालयात कोरोनावर उपचार घेत होता. मात्र पाच दिवसांतच त्याचा मृत्यू झाला. या घटनेला 3 महिन्यांचा काळ उलटला तरी हा कुत्रा रुग्णालयाबाहेर आपल्या मालकाची वाट पाहत होता.
संकलन, संपादन - प्रिया लाड
हे वाचा - घाबरु नका! देशातील सर्वात वयोवृद्धानेही 45 दिवसांच्या लढाईनंतर कोरोनाला हरवलं
संपादन - प्रिया लाड