जाहिरात
मराठी बातम्या / देश / कोरोना योद्धा : लग्नाच्या वाढदिवशीही ड्युटीवर, डॉक्टर दाम्पत्याची कहाणी ऐकून कराल कौतुक

कोरोना योद्धा : लग्नाच्या वाढदिवशीही ड्युटीवर, डॉक्टर दाम्पत्याची कहाणी ऐकून कराल कौतुक

कोरोना योद्धा : लग्नाच्या वाढदिवशीही ड्युटीवर, डॉक्टर दाम्पत्याची कहाणी ऐकून कराल कौतुक

डॉक्टर दाम्पत्यानं कोरोना वॉर्डमध्ये ड्युटीवर असताना सोशल डिस्टन्सिंगचं पालन करत लग्नाचा वाढदिवस साजरा केला.

  • -MIN READ
  • Last Updated :

रांची, 24 एप्रिल : कोरोनाशी लढण्यासाठी जगभरात डॉक्टर दिवस रात्र झटत आहेत. अनेक जण त्यांच्या कुटुंबापासून दूर राहून हे कर्तव्य बजावत आहेत. भारतातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आलं आहे. कोरोना ग्रस्तांच्या सेवेसाठी डॉक्टर्स, नर्स दिवसरात्र काम करत आहेत. रांचीतील राजेंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसचमध्ये एका डॉक्टर दाम्पत्यानं रुग्णालयातच लग्नाचा वाढदिवस साजरा केला. त्यांनी रुग्णालयातील स्टाफ आणि रुग्णांच्यासोबत हा दिवस घालवला. त्यानंतर त्यांची ड्युटी संपली असून आता दोघांनाही 14 दिवसांसाठी क्वारंटाइन सेंटरमध्ये पाठवण्यात आलं आहे. डॉक्टर निशांत पाठक आणि डॉक्टर रितिका यांचे लग्न दोन वर्षांपूर्वी झालं होतं. 16 एप्रिलला त्यांच्या लग्नाचा दुसरा वाढदिवस होता. गुरुवारी डॉक्टर निशांतने ट्विटरवर काही फोटो शेअर करत याची माहिती दिली होती. या ट्विटवर झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन आणि आरोग्यमंत्री बन्ना गुप्ता यांनी शुभेच्छा दिल्या.

जाहिरात

रिम्समध्ये निशांत आणि रितिका शिकत आहेत. निशांत मुंबईतील ग्रँट मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएस झाला आहे. त्यानंतर पीडियाट्रिक्समध्ये तो एमडी करत आहे. तर रितिका मुंबईतच एमबीबीएस केल्यानंतर गायनॉलॉजीमध्ये एमडी करत आहे. रिम्समधील कोरोना सेंटरमध्ये निशांत आणि रितिका यांची 15 ते 22 एप्रिल या कालावधीत ड्युटी होती. त्यानंतर दोघांनाही एका हॉटेलमध्ये 14 दिवस क्वारंटाइन करण्यात आलं आहे. हे वाचा : कौतुकास्पद! सरकारच्या आवाहनला प्रतिसाद देत तब्बल 700 डॉक्टरांनी उचललं पाऊल निशांतने म्हटलं की, 16 एप्रिलला आमचा लग्नाचा वाढदिवस होता पण या दिवशी केक किंवा दोस्त सोबत नव्हते. आम्ही तीन सहकारी आणि चार नर्ससोबत कोरोना वॉर्ड़मध्ये होतो. रुग्णांच्या चेहऱ्यांवर असलेलं हसू आमच्यासाठी गिफ्ट होतं. आम्हाला आशा आहे की ते कोरोनाविरुद्धची लढाई जिंकतील आणि हेच आमच्यासाठी खरं गिफ्ट असेल. हे वाचा : आनंद महिंद्रांनी रिक्षाचालकाचं केलं कौतुक, कोरोनाच्या संकटात थक्क करणारी कल्पना

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात