मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

'पायलट्स नको तिथे हात लावत, SEX साठीही फोर्स करतात', एअर होस्टेसनं उलगडली Dirty Secrets!

'पायलट्स नको तिथे हात लावत, SEX साठीही फोर्स करतात', एअर होस्टेसनं उलगडली Dirty Secrets!

एका फ्लाइट अटेंडंट (Flight Attendant) अर्थात एअर होस्टेस (Air Hostess) महिलेनं त्यांच्या आयुष्यातील अनेक रहस्य सोशल मीडियावर शेअर केली आहेत. त्यामुळं या झगमगीत आयुष्याची काळी बाजूही उघड झाली आहे.

नवी दिल्ली, 30 जून: जगात असा कोणताही व्यवसाय नाही ज्यात आव्हानं नाहीत. अनेकदा आपल्याला दुसरं क्षेत्र जास्त चांगलं आहे, असं वाटत असतं; पण जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे या उक्तीनुसार, त्या क्षेत्रात काम करायला लागल्यानंतरच त्याचे फायदे तोटे जाणवतात. असंच एक क्षेत्र आहे एअर होस्टेसचं (Air Hostess). अनेकदा त्यांचे कपडे, राहणीमान, पगार बघून वाटतं की खूप छान आयुष्य आहे. भरभक्कम पगार, विनामूल्य विमान प्रवास अशा सगळ्या गोष्टी पाहून अनेक मुली एअर होस्टेस होण्याचे ठरवतात; पण प्रत्यक्षात त्यांचे आयुष्य किती धावपळीचे, त्रासाचे असते हे त्यात उतरल्याशिवाय कळणार नाही.

एका फ्लाइट अटेंडंट (Flight Attendant) अर्थात एअर होस्टेस (Air Hostess) महिलेनं त्यांच्या आयुष्यातील अनेक रहस्य सोशल मीडियावर शेअर केली आहेत. त्यामुळं या झगमगीत आयुष्याची काळी बाजूही उघड झाली आहे.

मेल ऑनलाइन ट्रॅव्हलशी (Mail Online Travels) झालेल्या संभाषणात, सहा वर्षे या व्यवसायात काम केलेल्या फ्लाइट अटेंडंटनं यातील अनेक गुपितं उलगडली आहेत. कोरोना साथीमुळे तिची नोकरी गेली. त्यानंतर आलेल्या अडचणींचा सामना करताना तिनं या गोष्टीही शेअर केल्या. एअर होस्टेसला आकाशातही शारीरिक शोषणाला सामोरं जावं लागतं. याशिवाय अशा अनेक गोष्टी आहेत ज्या कधीही समोर येत नाहीत, असंही तिनं सांगितलं.

हे वाचा-मोठी बातमी: ब्राझील सरकारचा धक्कादायक निर्णय, भारताला मोठा झटका

अन्नाची नासाडी

विमान प्रवासात खाण्यापिण्याच्या (Food and Drinks) गोष्टीची प्रचंड प्रमाणात नासाडी होते. कितीतरी ज्यूसची पॅकेटस आणि कॅन्स तसंच महागडी दारुदेखील टॉयलेटमध्ये ओतून दिली जाते. शिल्लक असलेले खाद्यपदार्थ ओव्हनमध्ये साठवले जातात आणि नंतर डिस्पोजल टीमला दिले जातात. या व्यतिरिक्त, विमानात येणारे बरेच लोक आजारी असल्याचा खोटा दावा करून प्रवासाचा क्लास अपग्रेड करून घेतात. कुणीतरी नाटक करत आहे, हे समजलं तरीही कर्मचाऱ्यांना त्याविरुद्ध काहीही करता येत नाही.

मृत्यूपासून ते प्रपोज करण्यापर्यंत अनेक गोष्टींची साक्षीदार

या फ्लाइट अटेंडंटने सांगितलं की 6 वर्षांच्या कारकीर्दीत तिनं अनेक गोष्टी अनुभवल्या. यात सीटवर बसल्या ठिकाणी जीव गेलेला प्रवासीही पाहिला तसंच एका जोडप्याची एंगेजमेंटही पाहिली. एक अनुभव सांगताना ती म्हणाली की, एका चार वर्षाच्या मुलाचा विमान प्रवासात माझ्या डोळ्यासमोर मृत्यू झाला. आजही हा अनुभव मी विसरू शकत नाही. त्या मुलाची आई त्याच्या शेजारीच बसली होती. प्रत्येकजण त्याला वाचवण्याचा प्रयत्न करीत होता;पण तो वाचला नाही.

हे वाचा-37 वर्षं नाकात अडकली होती प्लॅस्टिकची चकती; कोरोना टेस्टमुळे आलं लक्षात

मेकअपपासून डाएटपर्यंत अनेक गोष्टींची घ्यावी लागते काळजी

सुंदर दिसणं ही या नोकरीची पहिली आणि महत्त्वाची अट असते. त्यामुळं मेकअप (Makeup) करणं अत्यंत आवश्यक असतं. नेहमीच लिपस्टिक, फाउंडेशन आणि आयलाइनर, नेल पॉलिश लावून तयार असावं लागतं. कंपनीचा गणवेश देण्यात येतो. तोच घालावा लागतो. प्रत्येक फ्लाइट अटेंडंटला आपलं वजन नियंत्रणात ठेवणं बंधनकारक असतं, त्यामुळं डाएट (Diet) पालनही अनिवार्य असते.

पायलट करतात गैरवर्तन

कोविडच्या आधी क्रू मेंबर्स (Crew Members) बर्‍याचदा पार्ट्यांमध्ये जात असत. तिथं पायलट एअर होस्टेसबरोबर फ्लर्ट करत तिचा नंबर घेत आणि मग त्यांच्या पदाचा गैरफायदा घेत सेक्ससाठीही (Sex) सक्ती करत असत. या एअर होस्टेसनं असंही सांगितलं की यशस्वी होण्यासाठी काही मुलीही या शॉर्टकटचा वापर करतात. विमान प्रवासादरम्यानही आक्षेपार्ह वर्तन होत असतं. फ्लाइटमध्ये पायलट एअर होस्टेसला आक्षेपार्ह पद्धतीनं स्पर्श करतात. त्यांचा गैरफायदा घेतात; पण या सगळ्या गोष्टी कधी उघड होत नाहीत. त्या गुप्तच राहतात.

First published:

Tags: Airplane, International, Sexual assault, Sexual harassment, Shocking news, Travel by flight