मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

सुलेमानीला ठार केल्यामुळे शांततेचं 'नोबेल' मलाच द्या - डोनाल्ड ट्रम्प

सुलेमानीला ठार केल्यामुळे शांततेचं 'नोबेल' मलाच द्या - डोनाल्ड ट्रम्प

'सुलेमानीला ड्रोन हल्ल्यात ठार करण्याचा आदेश देऊन मी अमेरिकेला वाचवलं आहे. त्यामुळे शांततेच्या नोबेलसाठी माझी निवड केली पाहिजे.'

'सुलेमानीला ड्रोन हल्ल्यात ठार करण्याचा आदेश देऊन मी अमेरिकेला वाचवलं आहे. त्यामुळे शांततेच्या नोबेलसाठी माझी निवड केली पाहिजे.'

'सुलेमानीला ड्रोन हल्ल्यात ठार करण्याचा आदेश देऊन मी अमेरिकेला वाचवलं आहे. त्यामुळे शांततेच्या नोबेलसाठी माझी निवड केली पाहिजे.'

  • Published by:  Ajay Kautikwar
शिंग्टन 10 जानेवारी : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे आपल्या वक्तव्यांमुळे सतत चर्चेत राहतात. यावर्षाच्या शेवटी अमेरिकेत अध्यक्षपदाची निवडणुक आहे. त्यामुळे त्यांनी निवडणुक प्रचारालाही सुरूवात केलीय. इराणचा दुसऱ्या क्रमांकाचा लष्करी अधिकारी कासिम सुलेमानी याला अमेरिकेने ठार केल्याने डोनाल्ड ट्रम्प हा मुद्दा निवडणुकीच्या प्रचारातही उपस्थित करत आहेत. ट्रम्प म्हणाले, सुलेमानीला ड्रोन हल्ल्यात ठार करण्याचा आदेश देऊन मी अमेरिकेला वाचवलं आहे. त्यामुळे शांततेच्या नोबेलसाठी माझी निवड केली पाहिजे. या कामगिरीमुळे मी या पुरस्कारासाठी पात्र आहे असंही ते म्हणाले. ट्रम्प पुढे म्हणाले, मला आत्तापर्यंत हा पुरस्कार मिळालेला नाही. इथियोपियाचे पंतप्रधान अबी अहमद यांना 2019 चा शांततेचा नोबेल पुरस्कार मिळाला होता. त्याचा संदर्भ देत ते म्हणाले आता माझी निवड करणं योग्य राहिलं. तर डेमोक्रॅटिक पक्षाने सुलेमानीला टार्गेट करण्याच्या निर्णयावरून ट्रम्प यांच्यावर टीका केलीय. इराणने अमेरिकेच्या इराकमधल्या तळांवर  क्षेपणास्त्रांनी हल्ले केले होते. त्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तातडीने पत्रकार परिषद घेत खुलासा केलाय. या हल्ल्यात अमेरिकेच्या सैनिकांचं आणि लष्करी तळांचं नुकसान झालेलं नाही. अमेरिकेचा एकही सैनिक जखमी झालेला नाही असं त्यांनी स्पष्ट केलं. वडिलांचं हेल्मेट घालून चिमुकली आली अंत्ययात्रेत, VIDEO पाहून डोळ्यात येतील अश्रू ट्रम्प म्हणाले, इराणविरुद्ध आम्ही आणखी कठोर निर्बंध लादणार आहोत. आम्हाला आखाती देशांच्या तेलाची गरज नाही. इराण दहशतवादाला खतपाणी घालत होता. आणि त्यांचा नायक हा कासिम सुलेमानी होता त्यामुळेच आम्ही त्याला ठार केलं असा खुलासा त्यांनी केला. इराणविरुद्धच्या लढाईत सगळ्या युरोपीयन देशांनी एकत्र यावं असं आवाहनही त्यांनी केलं. दरम्यान, अमेरिका आणि इराकच्या भांडणाचे पडसाद आता जगभर उमटायला लागले आहेत. जग तिसऱ्या महायुद्धाकडे लोटल जातंय का असाही प्रश्न विचारला जातोय. या पार्श्वभूमीवर मलेशियाचे पंतप्रधान महाथिर मोहंम्मद यांनी मुस्लिम देशांना एकत्र येण्याचे आवाहन केलंय. 94 वर्षांचे महाथिर हे जगातले सगळ्यात सगळ्यात बुजुर्ग पंतप्रधान समजले जातात. इराणचे दुसऱ्या क्रमांकाचे सैन्य कमांडर कासिम सुलेमानी यांना अमेरिकेने ड्रोन हल्ल्यात ठार केलं होतं. 176 प्रवाशांच्या विमानावर इराणनेच डागले क्षेपणास्त्र? समोर आला खळबळजनक VIDEO त्यानंतर आक्रमक झालेल्या इराणने त्यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केलीय. त्याच बरोबर अमेरिकेचा सूड घेण्याचीही धमकी दिलीय. इराकमधल्या अमेरिकेच्या तळावरही अमेरिकेने क्षेपणास्त्राने हल्ले केलेत. असं वातावरण तापलेलं असताना महाथिर यांनी मुस्लिम देशांना एकत्र करण्याचा प्रयत्न केलाय.
First published:

Tags: Donald Trump

पुढील बातम्या