मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

वडिलांचं हेल्मेट घालून चिमुकली पोहोचली अंत्ययात्रेत, VIDEO पाहून डोळ्यात येतील अश्रू

वडिलांचं हेल्मेट घालून चिमुकली पोहोचली अंत्ययात्रेत, VIDEO पाहून डोळ्यात येतील अश्रू

काही मिनिटं तिने ते हेल्मेट आपल्या डोक्यातच घालून ठेवलं होतं. ते दृष्य पाहून तिथल्या सगळ्यांचेच डोळे पाणावले गेले.

काही मिनिटं तिने ते हेल्मेट आपल्या डोक्यातच घालून ठेवलं होतं. ते दृष्य पाहून तिथल्या सगळ्यांचेच डोळे पाणावले गेले.

काही मिनिटं तिने ते हेल्मेट आपल्या डोक्यातच घालून ठेवलं होतं. ते दृष्य पाहून तिथल्या सगळ्यांचेच डोळे पाणावले गेले.

  • Published by:  Ajay Kautikwar
मेलबर्न 10 जानेवारी : ऑस्ट्रेलियातल्या जंगलात लागलेल्या आगीने सर्व जगाचं लक्ष वेधून घेतलं. ही आग एवढी भीषण होती की सर्व जगभर त्याबद्दल हळहळ व्यक्त केली गेली. या आगीत किती नुकसान झालं याची तर काही गणतीच नाही. या आगीत 50 कोटी प्राण्यांचा मृत्यू झालाय. तर लाखे प्राणी जखमी झालेत अशी माहिती पुढे आलीय. ही आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाने प्रयत्नांची शर्थ केली. पण हे संकटच एवढं मोठं होतं की ती आग आटोक्यात आणणं अशक्य झालं होतं. शेवटी पाऊस आल्याने आग नियंत्रणात येण्यास मदत झाली. मात्र तोपर्यंत लाखो हेक्टर जंगल जळून खाक झालं होतं. ही आग विझवताना अग्निशमन दलाचे 23 जवान मृत्यूमुखी पडले. यातल्याच अँड्र्यू ओल्डव्हायर या जवानावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी त्याच्या दीड वर्षांच्या चिमुकल्या मुलीने जे केलं ते पाहून सगळ्यांचेच डोळे पाणावले. न्यू साऊथ वेल्स इथल्या चर्चमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. त्या कार्यक्रमाला शार्लोट ही त्याची दीड वर्षांची मुलगी आली होती. ती आणि तिची आई ही अँड्र्यूच्या शपवपेटीजवळ जेव्हा गेली तेव्हा शार्लोटने त्या शवपेटीचं चुंबन घेतलं. यावेळी तिला तिच्या वडिलांचं हेल्मेट दाखविण्यात आलं होतं. त्यावेळी त्या चिमुकलीने ते हेल्मेट खेचून घेतलं आणि आपल्या डोक्यात घातलं. काही मिनिटं तिने ते हेल्मेट आपल्या डोक्यातच घालून ठेवलं होतं. ते दृष्य पाहून तिथल्या सगळ्यांचेच डोळे पाणावले गेले. याघटनेचे व्हिडीओ व्हायरल झाला असून सगळ्यांच्याच ह्रदयाला त्याने हात घातलाय. ऑस्ट्रेलियातील जंगलामध्ये गेल्या चार महिन्यांपासून आग लागली आहे. ही आग विझवण्यासाठी 3 हजारहून अधिक अग्निशामक दलाचे जवान काम करत आहेत. ही आग भीषण असल्यानं उष्णतेचं प्रमाणही वाढलं आहे. अशा परिस्थितीत जीवाची पर्वा न करता जवान आग विझवण्यासाठी झटत आहेत. आतापर्यंत अनेक जवान जखमी झाले तर एक जवान शहीद झाला. जिओफ्री किटन असे शहीद झालेल्या जवानाचे नाव असून त्याला मरणोत्तर शौर्य पुरस्कार देण्यात आला आहे. हा पुरस्कार दोन वर्षाच्या चिमुकल्याने स्वीकारला. या मुलाचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
First published:

Tags: Australia

पुढील बातम्या