जाहिरात
मराठी बातम्या / विदेश / Exclusive : तालिबानच्या म्होरक्यासोबत NEWS18 ची बातचीत, काय आहे भारताबाबतचं मत? दिली महत्त्वाची उत्तरं

Exclusive : तालिबानच्या म्होरक्यासोबत NEWS18 ची बातचीत, काय आहे भारताबाबतचं मत? दिली महत्त्वाची उत्तरं

Exclusive : तालिबानच्या म्होरक्यासोबत NEWS18 ची बातचीत, काय आहे भारताबाबतचं मत? दिली महत्त्वाची उत्तरं

तालिबानचा म्होरक्या शेर मोहम्मद स्टानाकझाई (Sher Mohd Stanakzai) याच्याशी CNN NEWS18 च्या प्रतिनिधींनी संवाद साधला असून अनेक महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेतली आहेत.

  • -MIN READ Trending Desk
  • Last Updated :

    नवी दिल्ली 30 ऑगस्ट : जागतिक पटलावर सध्या चर्चा आहे ती तालिबान (Taliban) या इस्लामी दहशतवादी संघटनेने अफगाणिस्तानचा ताबा घेतल्याची आणि त्यानंतर अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये (Kabul) सुरू असलेल्या प्रत्येक घटनेची. तसंच जीव वाचवण्यासाठी विमानावर बसून देशाबाहेर पडण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या जनतेची. आता तालिबानने सत्ता हातात घेतली आहे. अमेरिकीशी बोलणी करण्याची जबाबदारी पार पाडणारा तालिबानचा म्होरक्या शेर मोहम्मद स्टानाकझाई (Sher Mohd Stanakzai) हा तालिबानमध्ये डेप्युटी पोलिटिकल ऑफिस ऑफ इस्लामिक इमिरात ऑफ अफगाणिस्तान हे पद सांभाळतो. त्याच्याशी CNN NEWS18 च्या प्रतिनिधींनी संवाद साधला असून अनेक महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेतली आहेत. प्रश्न - तालिबान प्रशासनाचा भारताबाबतचा दृष्टिकोन कसा असेल? उत्तर – द इस्लामिक इमिरात ऑफ अफगाणिस्तानच्या (Afghanistan) परराष्ट्र मंत्रालयाला अफगाणिस्तानच्या शेजारी राष्ट्रांसोबत जगातल्या सर्वच देशांशी चांगले संबंध निर्माण करायचे आहेत. अमेरिकी सैन्याच्या (US Army) आणि नाटोच्या (NATO) तुकड्या गेली 20 वर्षं अफगाणिस्तानात तैनात होत्या आणि आता ते माघारी जात आहे त्यामुळे आम्ही अमेरिका आणि नाटो दोघांशीही मैत्रीपूर्ण संबंध ठेवण्याचा प्रयत्न करू. यामुळे ते पुन्हा येऊन अफगाणिस्तानातील पुननिर्माणाच्या कामात मदत करतील असं आम्हाला वाटतं. भारताबाबतही आमच्या पराराष्ट्र मंत्रालयाचा दृष्टिकोन तसाच आहे. या आधी जसे आमचे भारताशी मैत्रीपूर्ण, सांस्कृतिक आणि व्यापारी संबंध होते किंवा काही करार होते ते तसेच सुरू रहावेत असं आम्हाला वाटतं. फक्त भारतच नाही तर तजाकिस्तान, इराण आणि पाकिस्तान या आमच्या सर्वच शेजारी देशांशी आम्हाला मैत्रीपूर्ण संबंध ठेवायचे आहेत. प्रश्न – तालिबानचं भारताबाबतचं धोरण प्रतिकूल असेल आणि तो पाकिस्तानसोबत भारतातील दहशतवादाला खतपाणी घालेल अशी एक भीती व्यक्त होत आहे. याबद्दल तुमचं काय मत आहे ही भीती योग्य की अयोग्य? उत्तर – माध्यमांमध्ये (Media) बहुतेकवेळा जे छापून येतं ते चुकीचं असतं असं मला वाटतं. आमच्याकडून आम्ही आतापर्यंत असं कुठलं वक्तव्य केलेलं नाही किंवा तसे संकेतही दिलेले नाहीत. आमच्या क्षेत्रातील सर्वच शेजारी राष्ट्रांशी आम्हाला मैत्रीपूर्ण संबंध हवे आहेत. आणखी एका हवाई हल्ल्यानं उडवली काबुलची झोप, पहाटेच विमानतळावर तोफांचा मारा प्रश्न – लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मद यासारख्या दहशतवादी संघटनांसाठी अफगाणिस्तानची भूमी ही नंदनवनच बनेल त्यामुळे भारताला दहशतवादाचा मोठा धोका निर्माण होईल असं बोललं जात आहे. याबाबत तुम्ही काय म्हणाल? उत्तर – तुम्ही तालिबानचा इतिहास पाहिलात तर कधीही आमच्यापासून भारताला किंवा अफगाणिस्तानच्या कुठल्याही शेजारी राष्ट्राला धोका कधीच नव्हता आणि भविष्यातही तसं कधीच घडणार नाही. भारत आणि पाकिस्तान यांच्यात राजकीय आणि सीमेसंदर्भातील वाद दीर्घकाळापासून आहे हे निर्विवाद सत्य आहे. भारत आणि पाकिस्तानची (India and Pakistan) परस्परांना लागून असलेली सीमा मोठी आहे. त्यांनी त्यांच्या सीमांवर युद्ध करावं पण त्यांच्या दोघांच्या वादात अफगाणिस्तानला खेचू नये असंच आमचं म्हणणं आहे. त्यांनी अफगाणिस्तानचा वापर करू नये आणि आम्ही आमच्या भूमीचा वापर इतर कुठल्याही देशांना करू देणार नाही. प्रश्न - तुम्ही लष्कर किंवा जैशसारख्या दहशतवादी संघटनांना अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर करू देणार नाही असं म्हणता आहात हे खूपच महत्त्वाचं आणि जबाबदारीचं वक्तव्य तुम्ही करत आहात, तुम्ही त्याबाबत निर्धारानं सांगू शकता का? उत्तर – जगातील कुठल्याही देशाविरुद्ध आमच्या अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर करू न देणं हे आमचं कर्तव्य आहे. प्रश्न – तुम्ही काही दशकांपूर्वी भारतातील Indian Military Academy (IMA) मध्ये प्रशिक्षण घेतलं होतंत. तुम्ही भारतात प्रशिक्षण घेत असतानाची एखादी आठवण सांगू शकाल का? उत्तर – तुम्ही ही माझ्या तरुणपणीची गोष्ट सांगताय. जेव्हा रशियन (Russians) अफगाणिस्तानात येण्यापूर्वी मी तिथं प्रशिक्षण घेतलं होतं. मी IMA मध्ये प्रशिक्षण घेतलं आहे आणि मी IMA तून पदवी घेतली आहे. Afghanistan Crisis: अमेरिकेनं ISISवर केलेल्या ड्रोन हल्ल्यात 3 चिमुकल्यांचा बळी प्रश्न – तुम्ही अजून तिथल्या काही जणांच्या संपर्कात आहात का? उत्तर – नाही, भारतातल्या लोकांच्या संपर्कात मी नाही. प्रश्न – काही दिवसांपूर्वी झालेल्या काबूलमधील हल्ल्यांसाठी तुम्ही कोणाला जबाबदार मानता? उत्तर – माध्यमांमध्ये मी असं पाहिलं आहे की दैशने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. प्रश्न – पण मिळालेल्या माहितीनुसार आणि इंटिलिजन्सने दिलेल्या माहितीनुसार हक्कानी नेटवर्कने हे स्फोट घडवावेत आणि त्याची जबाबदारी ISIS स्वीकारेल असं ठरलं होतं. त्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे? उत्तर – अफगाणिस्तानचे शत्रू असंच म्हणतात. यात अजिबात सत्यांश नाही हे पूर्णपणे खोटं आहे. दैशने या स्फोटांची जबाबदारी घेतली आहे म्हणजे हे स्पष्ट आहे की हे स्फोट दैशनेच घडवून आणले आहेत. प्रश्न – अफगाणिस्तानात अजूनही अनेक हिंदू आणि शीख नागरिक अडकून पडले आहेत. तुम्ही त्यांना तिथून बाहेर काढण्यासाठी भारताला मदत करणार का? उत्तर – मला वाटतं त्यांना इथून सोडवून दुसऱ्या देशात नेण्याची गरज नाही. अफगाणिस्तानही त्यांची मातृभूमी आहे ते इथंच शांतीने राहू शकतात त्यांच्या जीविताला आता कुठलाही धोका नाही. ते आधी जसं अफगाणिस्तानात राहत होते तसंच ते आता राहू शकतील त्यामुळे गेल्या 20 वर्षांतील परिस्थितीमुळे किंवा आताच्या परिस्थितीमुळे ज्या हिंदू आणि शीख नागरिकांनी भारतात शरण घेतली आहे तेही लवकरच अफगाणिस्तानात परततील असं मला वाटतं. लग्नानंतर 4 दिवसातच युवकाचं टोकाचं पाऊल; धक्कादायक घटनेनं साताऱ्यात खळबळ प्रश्न – जगातील शक्तिशाली राष्ट्र आणि भारताकडून तालिबानला मान्यता मिळेल का, तुम्हाला काय वाटतं? उत्तर – आम्हाला तशीच आशा आहे. वास्तवात इस्लामिक इमिरात ऑफ अफगाणिस्तान आमच्या देशात सरकार स्थापन करेल आमचे शेजारी देश आणि जगातील इतर देशांना आमच्याशी चांगले संबंध ठेवण्याची इच्छा असेल त्यामुळे ते मान्यता देतील. आम्हाला असा विश्वास आहे की जेव्हा आम्ही आमचं सरकार अधिकृतपणे स्थापन करू तेव्हा अमेरिकेसह आमच्या शेजारचे देश आम्हाला पाठिंबा देतील. प्रश्न - भारताने अफगाणिस्तानात विकासाची अनेक कामं केली आहे त्याचं भविष्यात काय होईल असं तुम्हाला वाटतं? उत्तर – भारताने अफगाणिस्तानात निर्माण केलेल्या पायाभूत सुविधा आणि विकास प्रकल्प ही आमची राष्ट्रीय संपत्ती आहे आणि आम्ही त्याची त्याच पद्धतीने काळजी घेऊ. जी कामं अर्धवट राहिली आहेत तीही भारत भविष्यात पूर्ण करेल अशी आम्हाला आशा आहे. भारताने परत येऊन जी विकासकामं अर्धवट राहिली आहे ती पूर्ण करावीत असं आमंत्रण आम्ही भारताला देत आहोत. प्रश्न – भारताचे नागरिक विकासकामं पूर्ण करण्यासाठी अफगाणिस्तानात आले तर तुम्ही त्यांना पूर्ण संरक्षण देणार का? उत्तर – नक्कीच. जर कुणी आमच्या देशात येऊन काही विकासकामं करत असेल तर त्याला संरक्षण द्यावंच लागतं. पण मला वाटतं असे प्रश्न विचारण्याची गरजच नाही.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात