नवी दिल्ली, 17 मार्च: सिगारेटच्या पाकिटावर ‘आरोग्यासाठी हानिकारक’ असा वैधानिक इशारा दिलेला असतो. मात्र, त्याकडे साफ दुर्लक्ष करत धूम्रवलये सोडणाऱ्यांची संख्या जगात कमी नाही. धूम्रपानाच्या या सवयीमुळे वर्षाकाठी अनेकांचे प्राण जातात. तंबाखूचेही तसेच. अशा या जीवघेण्या सवयींना आळा घालण्यासाठी डेन्मार्कच्या सरकारने नवा नियम जाहिर केला आहे. डेन्मार्क सरकार 2010 नंतर जन्मलेल्या सर्व लोकांना निकोटीन उत्पादनांच्या विक्रीवर बंदी घालण्याचा विचार करत आहे. डेन्मार्कचे आरोग्य मंत्री, आरोग्य मंत्री मॅग्नस हेनिक यांनी एका पत्रकार परिषदेत घेतली होती. यामध्ये ते म्हणाले, “आमचे ध्येय 2010 मध्ये जन्मलेल्या प्रत्येकाने धूम्रपान थांबवणे किंवा निकोटीन-आधारित उत्पादनांचा वापर कमी करणे हे आहे.” त्याचबरोबर गरज भासल्यास वयोमर्यादा हळूहळू वाढवून या पिढीला विक्रीवर बंदी घालण्यास आम्ही तयार आहोत, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. डेन्मार्कमधील सध्याच्या नियमांनुसार, 18 वर्षाखालील सिगारेट विकत घेण्यावर किंवा इलेक्ट्रॉनिक सिगारेट ओढण्यावर बंदी आहे. डेन्मार्कमध्ये 15 ते 29 वयोगटातील 31% लोक धूम्रपान करतात याकडे आरोग्यमंत्र्यांनी लक्ष वेधले. डॅनिश असोसिएशन टू कॉम्बॅट कॅन्सरने केलेल्या सर्वेक्षणानुसार, 64% प्रतिसादकर्त्यांनी या योजनेला मतदान केले. यावरून लोक सरकारच्या बाजूने असल्याचे दिसून येत असून लवकरच त्यावर कायदा करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, 5.8 दशलक्ष लोकसंख्या असलेल्या स्कॅन्डिनेव्हियन देशांमध्ये तंबाखू हे कर्करोगाचे प्रमुख कारण आहे आणि दरवर्षी 13,600 लोकांचा मृत्यू होतो. भारतात दरवर्षी 10 लाख लोकांचा मृत्यू होतो भारतात दरवर्षी सरासरी 10 लाख लोकांचा धूम्रपानामुळे मृत्यू होतो. गेल्या 30 वर्षांत हा आकडा 58.9 टक्क्यांनी वाढला आहे. ज्या देशांमध्ये 1990 मध्ये 6 लाख लोकांचा तंबाखू सेवनामुळे मृत्यू झाला होता, 2019 मध्ये ही संख्या 10 लाख झाली आहे. मे २०२१ मध्ये लॅन्सेट या आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासात ही माहिती समोर आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.