मराठी बातम्या /बातम्या /देश /आज PM मोदींसोबत जम्मू काश्मीर सर्वपक्षीय बैठक; मेहबूबा मुफ्ती दिल्लीत दाखल, राज्यात हाय अलर्ट जारी

आज PM मोदींसोबत जम्मू काश्मीर सर्वपक्षीय बैठक; मेहबूबा मुफ्ती दिल्लीत दाखल, राज्यात हाय अलर्ट जारी

Prime Minister Meeting: आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निमंत्रणानंतर जम्मू- काश्मीरवर सर्वपक्षीय बैठक (Mainstream Parties in Jammu & Kashmir) होणार आहे.

Prime Minister Meeting: आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निमंत्रणानंतर जम्मू- काश्मीरवर सर्वपक्षीय बैठक (Mainstream Parties in Jammu & Kashmir) होणार आहे.

Prime Minister Meeting: आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निमंत्रणानंतर जम्मू- काश्मीरवर सर्वपक्षीय बैठक (Mainstream Parties in Jammu & Kashmir) होणार आहे.

नवी दिल्ली, 24 जून: आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Prime Minister Meeting ) निमंत्रणानंतर जम्मू- काश्मीरवर सर्वपक्षीय बैठक (Mainstream Parties in Jammu & Kashmir) होणार आहे. काल पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी) च्या प्रमुख मेहबूबा मुफ्ती दिल्लीत पोहोचल्या. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरमध्ये 48 तासांचा हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. यासह केंद्रशासित प्रदेशातही हाय स्पीड इंटरनेट सेवा बंद राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जम्मू - काश्मीरमध्ये कुठलीही अनुचित घटना घडू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

पीडीपी जम्मू-काश्मीरमध्ये तयार झालेल्या पीपल्स अलायन्स फॉर गुपकर डिक्लेरेशन (PAGD) युतीचा एक भाग आहे. ज्याची मंगळवारी बैठक झाली आणि त्यानंतर पंतप्रधानांशी सर्वपक्षीय बैठकीत सहभागी होण्याचा निर्णय घेण्यात आला.

5 ऑगस्ट, 2019 रोजी केंद्र सरकारनं जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा हटवल्यानंतर पहिल्यांदाच अशी बैठक बोलावण्यात आली आहे. ज्यात पंतप्रधान काश्मीरच्या वेगवेगळ्या राजकीय पक्षांशी बोलणार आहेत. केंद्र सरकारबरोबर झालेल्या या बैठकीत 8 राजकीय पक्षांच्या 14 नेत्यांना आमंत्रित करण्यात आले आहे.

जम्मू-काश्मीरला पुन्हा मिळणार स्वतंत्र राज्याचा दर्जा?

केंद्रात असणाऱ्या भाजपच्या सरकारकडून (Government of India) 5 ऑगस्ट, 2019 रोजी जम्मू-काश्मिरातील कलम 370 (Article 370) हटवण्यात आलं होतं. त्यानंतर जम्मू-काश्मीर (Jammu & Kashmir) आणि लद्दाख (Ladakh) हे दोन केंद्रशासित प्रदेश तयार कारणात आले होते. तेव्हापासूनच जम्मू काश्मिरातील काही राजकीय संघटनांचा आणि पक्षांचा याला विरोध होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून (PM Narendra Modi) त्यावेळी जम्मू- काश्मीरला राज्याचा दर्जा मिळवून देण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. त्यावर आता अंमलबजावणी सुरू होणार अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

सूत्रांच्या म्हणण्यानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा (HM Amit Shah) यांनी आधी दिलेल्या आश्वासनांनुसार जम्मू-काश्मीरला लवकरच राज्याचा दर्जा येईल, मात्र या प्रदेशाचा विशेष दर्जा काढून घेण्याबाबत कोणतीही चर्चा होणार नाही.

First published:

Tags: Delhi, Jammu and kashmir, Narendra modi, Pm modi