मराठी बातम्या /बातम्या /विदेश /जगातील सर्वात डेंजर लॅब; जिवंत माणसांवर जीवघेणे प्रयोग, वाचून अंगावर येईल काटा

जगातील सर्वात डेंजर लॅब; जिवंत माणसांवर जीवघेणे प्रयोग, वाचून अंगावर येईल काटा

कोरोनाव्हायरसमुळे (coronavirus) चर्चेत आलेली चीनची लेव्हल 4 लॅब (china lab) जपानच्या युनिट 731 (Unit 731) लॅबसमोर काहीच नाही.

कोरोनाव्हायरसमुळे (coronavirus) चर्चेत आलेली चीनची लेव्हल 4 लॅब (china lab) जपानच्या युनिट 731 (Unit 731) लॅबसमोर काहीच नाही.

कोरोनाव्हायरसमुळे (coronavirus) चर्चेत आलेली चीनची लेव्हल 4 लॅब (china lab) जपानच्या युनिट 731 (Unit 731) लॅबसमोर काहीच नाही.

बीजिंग, 27 एप्रिल : कोरोनाव्हायरसह चीनमधील लॅब चर्चेत आली. वुहान शहरात असलेली वुहान इन्स्टिीट्युट ऑफ व्हायरोलॉजीतून कोरोनाव्हायरस (Wuhan Institute of Virology) पसरला अशी शक्यता वर्तवली जात आहे. चायनीज अकॅडमी ऑफ सायन्सेस (Chinese Academy of Sciences - CAS) अंतर्गत येणाऱ्या या लॅबमध्ये कोरोनाव्हायरसवर भरपूर कालावधीपासून रिसर्च सुरू होता आणि तिथूनच हा व्हायरस लीक झाल्याचं मानलं जातं. अद्यापही याबाबत ठोस पुरावा मिळालेला नाही. मात्र लेव्हल 4 आणि सर्वात धोकादायक मानली जाणारी ही लॅब जपानच्या युनिट 731 (Unit 731) लॅबसमोर काहीच नाही.

काय आहे  युनिट 731 लॅब?

1930 ते 1945 दरम्यान जपानच्या सैनिकांनी (Imperial Japanese Army) पिंगफांग जिल्ह्यात एक प्रयोगशाळा तयार केली होती. ज्याच्याशी चीनचा काहीही संबंध नव्हता. उलट या ठिकाणी चीनी नागरिकांवरच जीवघेणे प्रयोग होत असतं. शिरो इशी नावाचा जपानी या युनिटचा प्रमुख होता. याला इतिहासातील भयंकर अशी टॉर्चर लॅब (torture lab in history) म्हणूनही ओळखलं जातं.

हे वाचा - जगभरातील अशा लॅब जिथे कोरोनासारख्या महाभयंकर व्हायरसवर सुरू आहेत प्रयोग

शिघा युनिव्हर्सिटी ऑफ मेडिकल सायन्सचे (Shiga University of Medical Science) प्राध्यापक कतसुओ निशियामा (Katsuo Nishiyama) यांच्या सांगण्यानसार जपान सरकारनं आपल्या पुरालेख विभागातूक काही दस्तावेज काढलेत. त्याचवेळी युनिट 731 शी संबंधित दस्तावेज मिळालेत. यामध्ये 1000 पेक्षा जास्त जापनीज डॉक्टर, नर्स, सर्जन्स आणि इंजिनीअर्सचा उल्लेख आहे. ज्यांनी चीनमधील जिवंत नागरिकांना आपल्या जीवघेण्या प्रयोगाचा भाग बनवलं.

या लॅबमध्ये असे प्रयोग झालेत जे वाचून तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही.

फ्रॉस्टबाइट टेस्टिंग

Yoshimura Hisato नावाचा शास्त्रज्ञ तापमानाचा शरीरावर काय परिणाम होतो, हे जाणून घेण्यासाठी हा प्रयोग करायचा. यासाठी सुरुवातीला लोकांचे हात-पाय थंड पाण्यात बुडवले जायचे आणि ते पूर्णपणे गोठल्यानंतर कडक पाण्यात बुडवले जायचे. या प्रयोगात एखादा लाकूड तुटावं तसं हात-पाय तुटायचे. यामध्ये अनेकांचा जीवही गेला आहे.

मरूता (Maruta)

ही याच युनिटची एक शाखा होती. यामध्ये माणसाचं शरीर किती टॉर्चर झेलू शकतं, हे पाहण्याचा प्रयत्न केला जायचा. चीनी सेनेला बेशुद्ध न करतात हळूहळू त्यांचा एक-एक अवयव कापला जायचा. यामध्ये सेनेच्या बहुतेक अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला त्यानंतर सामान्य जनतेवर हा प्रयोग होऊ लागला.

व्हायरस शरीरात सोडून शरीराची चिरफाड

निरोगी लोकांच्या शरीरात प्लेगसारखे व्हायरस सोडले जायचे. त्यानंतर संक्रमित व्यक्तीच्या कोणत्या भागावर व्हायरसचा परिणाम झाला हे तपासण्यासाठी तो जिवंत असतानाच त्याच्या शरीराची चिरफाड केली जायची.  व्हायरस शरीरात सोडल्यानंतर तो मरण्याचीही प्रतीक्षा केली जायची नाही. यावेळी बहुतेक लोकांचा गँगरीनमुळे मृत्यू व्हाययचा आणि तो जिवंत राहिलाच तर त्याला जिवंत जाळलं जायचं.

सर्वात भयावह सिफलिस प्रयोग

त्यावेळी सैनिकांमध्ये सिफलिस हा लैंगिक आजार सामान्य होता. मात्र त्यावर उपचार नसल्याने बहुतेक सैनिकांचा या आजारामुळे मृत्यू व्हायचा. त्यामुळे चीनी कैद्यांना सिफलिस संक्रमित केलं जायचं आणि त्यांना वेगवेगळी औषधं दिली जायची. इतकंच नव्हे तर लैंगिक आजार पसरतो कसा हे पाहण्यासाठी हा आजार झालेल्या पुरुषांना निरोगी महिलांसह शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडलं जायचं.

गर्भातील बाळावर प्रयोग

चीनी महिलांसह बलात्कार करून त्यांना गरोदर केलं जायचं. त्यानतंर त्यांच्या शरीरात आजाराचे व्हायरस सोडले जायचे जेणेकरून गर्भातील बाळाला व्हायरची लागण होते की नाही, याचा अभ्यास केला जाईल. Findings into civilian medicine मध्ये याबाबत लिहिण्यात आलं होतं. मात्र हा रिसर्च पेपर नंतर कुठे सापडला नाही.

जर्म वॉरफेअर (germ warfare)

यामध्ये चीनी सेना आणि सामान्य लोकांच्या शरीरात जीवघेणे व्हायरस सोडले जायचे आणि त्यांना एकमेकांना संक्रमित करण्यासाठी सोडलं जायचं. 1940 साली ऑक्टोबरमध्ये जपानच्या विमानांनी चीनच्या Quzhou गावात असे बॉम्ब सोडले ज्यामध्ये 30000 पिस्सू होते. ज्यानंतर गावातील प्रत्येक व्यक्तीचा प्लेगमुळे मृत्यू झाला आणि प्लेग पसरत गेला.

हे वाचा - Coronavirus चा धोका : लिफ्ट आणि जिन्यांचा वापर करताना सावध राहा

त्यानंतर हा रेकॉर्ड जाळून टाकण्यात आला. 1990 च्या अखेरीस जपानने आपल्या एका युनिटमार्फत चीनी नागरिकांवर आपण जीवघेणे असे प्रयोग केल्याचं मान्य केलं होतं, मात्र त्या प्रयोगांबाबत सविस्तर माहिती दिली नव्हती.

First published:
top videos

    Tags: China, Coronavirus, Virus