Home /News /lifestyle /

Coronavirus चा धोका : लिफ्ट आणि जिन्यांचा वापर करताना सावध राहा

Coronavirus चा धोका : लिफ्ट आणि जिन्यांचा वापर करताना सावध राहा

लिफ्टची (lift) बटनं आणि जिन्यांच्या (staircase) रेलिंगला एखाद्या कोरोनाग्रस्त व्यक्तीचा स्पर्श झालेला असू शकतो.

    मुंबई, 27 एप्रिल : कोरोनाव्हायरस (Coronavirus) कोणत्याही पृष्ठभागावर विशिष्ट कालावधीसाठी राहू शकतो. मग कोणत्याही वस्तूमार्फत, कोणत्याही ठिकाणी तो पसरण्याचा धोका आहे. त्यामुळे हल्ली प्रत्येक वस्तूला, प्रत्येक ठिकाणी स्पर्श करताना मनात विचार करतो, की त्यावर कोरोनाव्हायरस तर नसेल ना? आपल्याला कोरोनाव्हायरसचा धोका तर नाही ना? असाच विचार येतो तो लिफ्ट आणि जिन्यांचा वापर करताना. सध्या बहुतेक प्रकरणांमध्ये कोरोनाव्हायरसची लक्षणं दिसत नाहीत, त्यामुळे आपल्या आजूबाजूला कोरोनाचा रुग्ण असू शकतो. अशावेळी आपणच काळजी घेतलेली बरी. कोरोनाव्हायरस रुग्णाचा स्पर्श झालेल्या ठिकाणांना आपला स्पर्श होऊ न देणं हा एक खबरदारीचा मार्ग आहे. त्यामुळे लिफ्ट (lift) आणि जिन्यांचा (staircase) वापर करतानाही काळजी घेणं गरजेचं आहे. लिफ्ट आणि जिन्यांचा वापर किती तरी लोकं करतात, त्यामुळे लिफ्टची बटनं आणि जिन्यांचं रेलिंग याला कुणीकुणी स्पर्श केला असेल आपल्याला माहिती नाही, अशात त्याला कोरोनाग्रस्त व्यक्तीचा स्पर्श झालेला असेल तर इतरांनाही कोरोनाव्हायरसचा धोका असू शकतो. हा धोका कसा टाळता येईल ते पाहुयात. लिफ्ट वापरताना काय काळजी घ्याल लिफ्टचं बटन प्रेस करताना टूथपिक, इयरबड किंवा टिश्यू पेपरच्या मदतीने प्रेस करा. लिफ्टचं बटन प्रेस करण्यासाठी वापरलेली वस्तू जिथं कुणी त्याला स्पर्श करणार नाही, अशा ठिकाणी फेका. यानंतर सॅनिटायझरने हात सॅनिटाइज करा. जिन्यांचा वापर करताना काय काळजी घ्याल जिने चढताना जिन्यांच्या रेलिंगला हात लावू नका. एखाद्या कोरोनाग्रस्त व्यक्तीने या रेलिंगला स्पर्श केलेला असू शकतो आणि तुमच्यापर्यंत व्हायरस पोहोचू शकतो चुकून जर तुम्ही जिन्यांच्या रेलिंगला स्पर्श केला असेल तर घरी पोहोचल्यावर कोणत्याही ठिकाणी स्पर्श करू नका सर्वात आधी हात स्वच्छ धुवा. अशी खबरदारी घेतली तर तुम्हाला लिफ्ट आणि जिन्यामुळे कोरोनाव्हायरस तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा धोका नाही. संकलन, संपादन - प्रिया लाड
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या