मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

या कपलनं नव्या शेजाऱ्यांना वाटली चक्क मोफत बीअर, कारण वाचून म्हणाल वाह क्या बात है!

या कपलनं नव्या शेजाऱ्यांना वाटली चक्क मोफत बीअर, कारण वाचून म्हणाल वाह क्या बात है!

beer

beer

नव्या शेजाऱ्यांना बिअर देण्याची कल्पना तुम्हाला कशी वाटते?

  • Published by:  News18 Desk

फ्लोरिडा, 22 मार्च : घर बदलून नव्या जागी शिफ्ट झाल्यावर अनेकदा आपण शेजाऱ्यांशी नातं जोडण्यासाठी विविध मार्ग अवलंबतो. त्यांना चहाला किंवा नाश्त्याला बोलावणं हा त्यातला एक मार्ग. अमेरिकेतील एका जोडप्यानं मात्र अनोखा मार्ग अवलंबला आहे. (Florida news)

हे जोडपं अमेरिकेतील फ्लोरिडा इथं राहतं. कोरोनाकाळात हे जोडपं एका नव्या जागेत शिफ्ट झालं. या जोडप्यानं नव्या जागी गेल्यावर एक आगळीच भेट शेजाऱ्यांना दिली. या जोडप्यानं शेजाऱ्यांना चक्क मोफत बियर वाटली. (couple offers free beer to neighbors)

अमांडा आणि थॉमस इव्हान्स यांनी गेल्यावर्षी कोरोना सुरू होण्याच्या सुरवातीच्या काळात घर हलवण्याचं ठरवलं. फोर्ट मेयर्समधून त्यांनी केप कोरल इथं घर हलवलं. अमांडा इव्हान्स याबाबत ABC7 टेलिव्हिजनशी बोलताना म्हणाली, 'हा पहिल्यांदाच घर विकत घेणाऱ्यांहून एकदम वेगळाच अनुभव होता. आम्हाला नव्या शेजाऱ्यांना नक्की कधी भेटायला मिळेल याचा काही अंदाज येत नव्हता.' (couple gifts free beer to neighbors)

अमांडा आणि थॉमस यांच्याकडे एक पाळीव कुत्रा होता. निदान त्याला फिरवताना तरी या दोघांना घराच्या आसपास फिरता येत असे. त्यानिमित्तानं येणाऱ्या-जाणाऱ्या काही लोकांना भेटता येत असे. अमांडा सांगते, 'तुम्ही खरंतर लोकांना चॉकलेट्स, मिठाई किंवा असं काही देऊन घरी बोलावता. मात्र सध्या वातावरण असं आहे, की लोकांना नक्की कसं वाटत आहे याबाबत आम्हाला खात्री नव्हती.' (couple shifts house in pandemic gives beer to neighbors)

हेही वाचा VIDEO: विमानाच्या पायऱ्या चढताना तीन वेळा घसरले जो बायडेन; हवेला दिला दोष

त्यांनी एक बॅनरच घराबाहेर लावलं. यावर लिहिलं होतं, 'हाय, आम्ही इथं नव्यानं राहायला आलो आहोत. आम्हाला आमच्या गोड शेजाऱ्यांना भेटायची खूप इच्छा आहे. आम्ही घराच्या व्हरांड्यात बीअर घेऊन थांबतो आहोत. ज्यांना कुणाला भेटायची इच्छा आहे त्यांनी जरूर यावं. आम्हाला आपल्याला भेटण्याची खूप उत्सुकता आहे.'

हेही वाचा इन्स्टाग्राम फिल्टरसारखे दिसण्यासाठी चेहऱ्याची शस्त्रक्रिया; खर्च केले 21 लाख

अमांडा आणि तिच्या नवऱ्याला याची खात्री नव्हती की कुणीतरी येईल. मात्र 'मोफत बीअर'ची पाटी दिसल्यावर लोकांची झुंबड उडाली. थॉमस म्हणतो, 'कुठंही फ्री बीअरची पाटी पाहून लोकांनी आकर्षित होणं हे मोठंच गमतीदार आहे. लोकांना मैत्री जोडण्यासाठी बोलावतानाही हा एक मस्तच मार्ग असू शकतो. आम्ही याचा अनुभव घेतला आहे.' मैत्रीत नव्यानं संवाद सुरू करण्यासाठी हे असं काहीतरी करणं छानच आहे.

First published:

Tags: Alcohol, Beer, Covid-19, Cute couple, Florida, International, Pandemic, Relationship