जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / क्या बात है! Internship करताना त्याच कंपनीत Job हवाय? मग 'या' टिप्स नक्की येतील कामी; वाचा

क्या बात है! Internship करताना त्याच कंपनीत Job हवाय? मग 'या' टिप्स नक्की येतील कामी; वाचा

क्या बात है! Internship करताना त्याच कंपनीत Job हवाय? मग 'या' टिप्स नक्की येतील कामी; वाचा

आज आम्ही तुम्हाला सहा काही टिप्स (Tips to get job after Internship) देणार आहोत ज्यामुळे तुम्ही इंटर्नशिप करताना त्याच कंपनीत जॉब मिळवू शकाल.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई,12 मार्च: आजकालच्या काळात कोणत्याही कंपनीत चांगली नोकरी (How to get a job) हवी आले तर त्या आधी Internship करणं (Internship Tips) आवश्यक असतं. काही कॉलेजमध्ये तर फायनल इयरलाच इंटर्नशिप (Internship in final year) करणं अनिवार्य असतं. इंटर्नशिप केल्यामुळे (Advantages of Internship) उमेदवारांना कामाचा अनुभव तर येतोच पण कंपनीतील प्रत्यक्ष वातावरण कशा प्रकारचं असतं याबद्दल एक आयडिया येते. म्हणून इंटर्नशिप महत्त्वाची असते. काही मोठ्या आणि नामांकित कंपन्यांमध्ये इंटर्नशिप करताना उमेदवारांना त्याच कंपनीत जॉबवर (How to get job while doing Internship) घेण्याची आशा दाखवली जाते. कित्येकदा उमेदवारांच्या परफॉर्मन्सनुसार त्यांना जॉबही दिला जातो. तुम्हालाही इंटर्नशिप झाल्यानंतर त्याच कंपनीत जॉब करण्याची इच्छा आहे? (How to get job after Internship) मग हे बातमी फक्त तुमच्यासाठी आहे. आज आम्ही तुम्हाला सहा काही टिप्स (Tips to get job after Internship) देणार आहोत ज्यामुळे तुम्ही इंटर्नशिप करताना त्याच कंपनीत जॉब मिळवू शकाल. चला तर मग जाणून घेऊया. प्रोफेशनल्स प्रमाणे राहा कोणत्याही ठिकाणी इंटर्नशिप करताना तुमचे केस व्यवस्थित ठेवलेले, कपडे चांगले इस्त्री केलेले आणि शूज चांगले पॉलिश केलेले असले पाहिजेत. यामुळे तुम्हाला एक वेगळ्या प्रकारचा कॉन्फिडन्स जाणवतो आणि तुम्ही प्रोफेशनल दिसता. यामुळे कंपनीतील वरिष्ठांना तुमचं काम आवडू शकतं आणि तुम्हाला तिथे नोकरी मिळू शकते. म्हणून कोणत्याही कम्पनित इंटर्नशिप करताना तुमचे कपडे नीटनेटके वापरा आणि प्रोफेशनल राहा. JOB ALERT: मुंबईतील ‘या’ सरकारी संस्थेत प्राध्यापकांसाठी होणार भरती; करा अर्ज कंपनी निवडणं आवश्यक सर्व प्रथम, कंपनीकडे इंटर्नसाठी जागा आहे की नाही किंवा त्यांनी इंटर्नशिप नोकऱ्यांना कधी परवानगी दिली आहे का ते तपासा. फक्त एका कंपनीला चिकटून राहू नका; तुमचे पर्याय खुले ठेवा. एकल कंपनी आणि एकल स्पेशलायझेशन अंतर्गत, तुमच्याकडे अनेक डोमेन असू शकतात ज्यातून तुम्ही निवडू शकता; मात्र तुम्ही तुमच्या कामाच्या आणि शिक्षणाशी संबंधित डोमेन निवडले असल्याची खात्री करा. महिलांनो, 10वी पास असाल तर सरकारी नोकरीची ‘ही’ संधी सोडू नका; 92,000 पगार स्वतःला अपडेटेड ठेवा असे काय आहे जे तुम्हाला वेगळे करू शकते? असे काय आहे जे तुम्हाला बर्‍याच फ्रेशर्समध्ये उभे राहण्यास मदत करू शकते? तुम्ही अर्ज पत्र तयार करू शकता, ते तयार करण्यात आणि सादर करण्यात तुमच्याकडून चुका होणार नाहीत याची खात्री करण्यासाठी तुम्ही एक सोपी आणि व्यावसायिक भाषा निवडली आहे याची खात्री करा. स्वतःला इतरांपेक्षा वेगळे कसे ठेवता येईल याची खात्री करा. स्वतःला सतत अपडेटेड ठेवा. यामुळे तुम्हाला जॉब मिळण्याचे चान्सेस वाढतच जातील.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: जॉब
  • First Published :
जाहिरात
जाहिरात