जाहिरात
मराठी बातम्या / विदेश / CORONA पुन्हा परतला, चीनमध्ये पुन्हा Lockdown, 5 कोटी नागरिक कैद

CORONA पुन्हा परतला, चीनमध्ये पुन्हा Lockdown, 5 कोटी नागरिक कैद

 पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे चौथ्या लाटेची भीती वर्तवली जात आहे.

पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे चौथ्या लाटेची भीती वर्तवली जात आहे.

चीनमध्ये कोरोनाने (Corona) पुन्हा डोके वर काढले आहे. गेल्या तीन दिवसांपासून कोरोनाने पुन्हा आपले हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. गेल्या 24 तासांत देशात 5,280 नवीन प्रकरणे नोंदली (Covid Cases in China) गेली आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 16 मार्च: चीनमध्ये कोरोनाने (Corona) पुन्हा डोके वर काढले आहे. गेल्या तीन दिवसांपासून कोरोनाने पुन्हा आपले हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. गेल्या 24 तासांत देशात 5,280 नवीन प्रकरणे नोंदली (Covid Cases in China) गेली आहेत, त्यापैकी 3,507 जणांवर घरात उपचार सुरु आहेत. वुहानमध्ये साथीच्या रोगाचा उद्रेक झाल्यानंतर ही दुसरी सर्वाधिक प्रकरणे आहेत. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर चीनमधील 13 शहरे आणि काउंटीमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, व्हायरसच्या ओमिक्रॉन प्रकाराचा नवीन प्रकार देशात पसरला आहे. कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे सुमारे 5 कोटी चीनी नागरिक त्यांच्या घरात कैद झाले आहेत. सध्याच्या काळात जिलिन प्रांतात कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. याशिवाय चीनचे तांत्रिक केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेनझेन प्रांतातही कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी देशभरात मोठ्या प्रमाणावर चाचणी वाढवण्यात आली आहे. जिलिन प्रांतातील लोकांनी आतापर्यंत तपासाच्या सहा फेऱ्या पूर्ण केल्या आहेत. या तयारीवरून असे दिसून येते की चीनमध्ये जवळपास महिनाभरात चौथी लाट पसरली आहे. उत्तर कोरिया बॉर्डर स्थित जिलिन प्रांतात सार्वजनिक वाहतुकीवर बंदी घालण्यात आली आहे. जिलिन प्रांताचे गर्वनर सोमवारी तात्काळ बैठक बोलावली. या बैठकीमध्ये एका आठवड्यात शून्य कोविडचे लक्ष्य ठेवले. चीनमध्ये आतापर्यंत कोरोनाच्या अनेक लाटा येऊन गेल्या आहेत; पण फेब्रुवारी 2020 नंतर इतक्या मोठ्या संख्येनं रुग्ण कधीही आढळले नव्हते. अर्थात आताच्या या लाटेत अजूनपर्यंत एकही मृत्यू झालेला नाही अशी माहिती आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात