• Home
 • »
 • News
 • »
 • videsh
 • »
 • Interesting! जोडप्यानं चालवलं डोकं, कमी खर्चात केलं शानदार लग्न

Interesting! जोडप्यानं चालवलं डोकं, कमी खर्चात केलं शानदार लग्न

एका जोडप्यानं शानदार आणि (Couple saved money yet did grand marriage) साग्रसंगीत लग्नदेखील अतिशय कमी खर्चात करून दाखवलं आहे.

 • Share this:
  लंडन, 7 नोव्हेंबर: एका जोडप्यानं शानदार आणि (Couple saved money yet did grand marriage) साग्रसंगीत लग्नदेखील अतिशय कमी खर्चात करून दाखवलं आहे. युकेमध्ये राहणाऱ्या या जोडप्यानं आपल्या लग्नाचं नियोजन कित्येक महिने (Planning for marriage) अगोदरच केलं होतं. लग्नात सरगळी हौस आणि मौज तर करायची, पण अनावश्यक खर्चाला फाटा देत पैसेही वाचवायचे, असा चंग दोघांनी बांधला (Planned low cost marriage) आणि तो तडीस नेऊन दाखवला. लग्नाचं नियोजन युकेमध्ये राहणाऱ्या जॅस्मिन आणि सॅम किंगडन यांनी एकमेकांशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यापूर्वी काही महिने ते रिलेशनशिपमध्ये होते. लग्न करण्याचा निर्णय़ घेण्यापूर्वी त्यांनी स्वतःचं एक घर बुक केलं होतं आणि त्यासाठी पैसे वाचवण्याचा त्यांचा प्रयत्न होता. त्यामुळे लग्न तर करायचं, पण घरासाठी पैसेही वाचवायचे, असं त्यांनी ठरवलं. अनेकजण लग्नात वारेमाप खर्च करतात. त्यातील बहुतांश खर्च एक तर अनावश्यक असतो किंवा टाळता येण्यासारखा असतो. एकेका गोष्टीच्या खर्चाचा विचार करून तो खर्च कसा कमीत कमी करता येईल, याचं नियोजन केलं. आईवडिलांच्या मालकीच्या लॉनमध्ये रिसेप्शन लग्नानंतरच्या रिसेप्शनसाठी जॅस्मिनच्या आईवडिलांच्या नावे असलेल्या लॉनची निवड करण्यात आली. त्यामुळे जागेच्या भाड्याचा खर्च वाचला. चर्चमध्ये लग्न करून सर्व वऱ्हाडी मंडळी थेट या लॉनमध्ये आली. लग्नापूर्वी लावली झाडं लग्नात ज्या ज्या फुलांची गरज आहे, त्या फुलांची रोपं काही महिने अगोदरच दोघांनी लावली होती. त्यामुळं लग्नात त्यांना ताजी फुलं मिळाली आणि त्यावर खर्च करावा लागला नाही. लग्नात कप-केक बनवण्याची जबाबदारी वराच्या घरच्यांवर सोपवण्यात आली होती. तर घरकामासाठी येणाऱ्या महिलेनंच लॉनची सजावट करण्याची तयारी दाखवल्यामुळे तोही खर्च वाचला. फोटोग्राफरही केवळ अर्ध्या दिवसासाठी बुक करण्यात आला होता. हे वाचा- चमकदार, मुलायम केस हवेत? मग या बियांचा करा तुमच्या रोजच्या आहारात समावेश वाचले लाखो रुपये पाहुण्यांनी रात्रभर ही रिसेप्शन पार्टी एंजॉय केली, मात्र योग्य नियोजनामुळे दोघांचे लाखो रुपये वाचले. केवळ 5 लाख रुपयांत हे शानदार लग्न पार पडलं.
  Published by:desk news
  First published: