मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

चमकदार, मुलायम केस हवेत? मग या बियांचा करा तुमच्या रोजच्या आहारात समावेश

चमकदार, मुलायम केस हवेत? मग या बियांचा करा तुमच्या रोजच्या आहारात समावेश

काही बिया (seeds benefit hair health) देखील आपला आहार समृद्ध करू शकतात. दाट केसांसाठी आवश्यकतेनुसार कच्च्या किंवा शिजवलेल्या बियांचे सेवन करू शकता. त्यांच्याबद्दल जाणून घेऊया.

काही बिया (seeds benefit hair health) देखील आपला आहार समृद्ध करू शकतात. दाट केसांसाठी आवश्यकतेनुसार कच्च्या किंवा शिजवलेल्या बियांचे सेवन करू शकता. त्यांच्याबद्दल जाणून घेऊया.

काही बिया (seeds benefit hair health) देखील आपला आहार समृद्ध करू शकतात. दाट केसांसाठी आवश्यकतेनुसार कच्च्या किंवा शिजवलेल्या बियांचे सेवन करू शकता. त्यांच्याबद्दल जाणून घेऊया.

  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 07 नोव्हेंबर : आपले केस (hair) दाट, काळेभोर, निरोगी असावेत, असं सर्वांनाच वाटतं. सुंदर, मजबूत, चमकदार केसांमुळं व्यक्तिमत्त्व तर खुलून दिसतंच; शिवाय, आपल्याला आत्मविश्वासही जाणवतो. परंतु आपल्या व्यग्र जीवनशैलीत केसांच्या आरोग्याकडे जास्त लक्ष द्यायला अनेकांकडे वेळ नसतो..

निरोगी आहारामुळे केस गळती टाळता येऊ शकते आणि केसांच्या वाढीसही चालना मिळते. जोपर्यंत तुम्ही स्वतःला योग्य पोषक आणि खनिजतत्वे खायला देत नाही, तोपर्यंत बाहेरून केसांसाठी घेतल्या जाणाऱ्या औषधांचा परिणाम मिळणार नाही.

भाज्या आणि फळांमध्ये योग्य जीवनसत्त्वे, प्रथिने आणि फॅटी ऍसिड असतात. परंतु, काही बिया (seeds benefit hair health) देखील आपला आहार समृद्ध करू शकतात. दाट केसांसाठी आवश्यकतेनुसार कच्च्या किंवा शिजवलेल्या बियांचे सेवन करू शकता. त्यांच्याबद्दल जाणून घेऊया-

अंबाडीच्या बिया

अंबाडीच्या बियांमध्ये ओमेगा 3 फॅटी अॅसिड आणि फायबर भरपूर प्रमाणात असते. ते केस गळणे कमी करतात आणि टाळू मजबूत करण्यास मदत करतात. त्यामध्ये प्रथिने, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि जस्तदेखील विपुल प्रमाणात आहेत.

तीळ

तीळ काळे किंवा पांढरे दोन्ही प्रकारचे असतात. त्यात अतिशय पौष्टिक घटक आणि जीवनसत्त्वे, खनिजे आणि फॅटी अ‌ॅसिड असतात. ते केसांच्या वाढीस प्रोत्साहन देतात आणि आपल्या केसांना नैसर्गिक चमक देतात.

हे वाचा - Windows 11: `विंडोज 11` यूजर्ससाठी ठरतंय डोकेदुखी; हे` फीचर्स ठरताहेत निकामी; युजर्समध्ये नाराजी

सूर्यफूल बिया

न्याहारीसाठी चिप्स आणि फ्राईंऐवजी सूर्यफुलाच्या बिया खाणं उत्तम असते. ते व्हिटॅमिन ईचे एक उत्तम स्त्रोत देखील आहेत आणि तुम्ही ते तुमच्या सॅलड्स किंवा स्मूदीवर सहजपणे शिंपडू शकता.

भोपळ्याच्या बिया

भोपळ्याच्या बिया हा नेहमीच अनेकांचा आवडता आणि स्वादिष्ट नाश्ता आहे. केसांच्या वाढीसाठी भोपळ्याच्या बिया अत्यंत फायदेशीर आहेत. त्यात जस्त, मॅग्नेशियम, कॅल्शियम, लोह इत्यादी खनिजांचा खजिना आहे. लोह केसांसाठी आरोग्यदायी आहे आणि केस पातळ होणे आणि तुटण्याची समस्या टाळण्यासाठी उपयोगी आहे.

हे वाचा - महाराणी ताराराणींची महती सांगणारा जगातील पहिला मराठी हॉलिवूड चित्रपट ; मराठीसहीत इंग्रजी भाषेत होणार चित्रित

चिया बियाणे

केसांच्या वाढीसाठी आवश्यक असलेले फॅटी ऍसिड, प्रथिने, फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे यामध्ये भरपूर प्रमाणात असतात. त्यात लोह आणि सेलेनियम देखील असतात जे केसांचा पोत, वाढ आणि चमक सुधारतात.

First published:

Tags: Health Tips, Woman hair