सेक्स करताना बाल्कनीतून खाली पडलं कपल, दोघांचाही जागीच मृत्यू

सेक्स करताना बाल्कनीतून खाली पडलं कपल, दोघांचाही जागीच मृत्यू

या कपलने घरात सगळ्यांसाठी एक पार्टी ठेवली होती. ही पार्टी झाल्यानंतर त्यांनी घराच्या बाल्कनीत सेक्स केला. पण सेक्स करताना ते शेजारच्यांच्या टेरेसवर पडले.

  • Share this:

मुंबई, 30 सप्टेंबर : सेक्स करताना काय काळजी घ्यायला पाहिजे, सेक्स कुठे करावा, कधी करावा, कशा पद्धतीने करावा यावर अनेकदा डॉक्टर्स, तज्ज्ञ मार्गदर्शन करत असतात. पण सेक्स करताना जर योग्य ती खबरदारी घेतली नाही तर काय होतं हे या दोघांच्या उदाहरणावरून लक्षात येईल.

या कपलने घरात सगळ्यांसाठी एक पार्टी ठेवली होती. ही पार्टी झाल्यानंतर त्यांनी घराच्या बाल्कनीत सेक्स केला. पण सेक्स करताना ते शेजारच्यांच्या टेरेसवर पडले.इक्वेडोर या देशात ही घटना घडली. या दोघांपैकी जी महिला होती तिच्या ग्रॅज्युएशनची पार्टी ठेवण्यात आली होती. त्यानंतर हे दोघंजण तिसऱ्या मजल्यावर सेक्स करत होते. ते खाली पडल्यामुळे मोठा आवाज झाला आणि त्यांच्या शेजाऱ्यांना ते अर्धनग्न अवस्थेत सापडले.

8 वर्षांच्या मुलीची आई

यातल्या महिलेच्या नातेवाईकाने दिलेल्या माहितीनुसार, ही महिला एका 8 वर्षांच्या मुलीची आई होती. जिथे ही घटना घडली तिथून महिलेचे बूट आणि कपडे पोलिसांना सापडले.

ही घटना नेमकी कशामुळे घडली याचा पोलीस तपास करतायत. याआधी फ्रान्समध्येही अशाच पद्धतीने दोघंजण सेक्स करताना खाली पडले होते आणि जखमीही झाले होते.

================================================================================

VIDEO : मी ब्ल्यू फिल्म करत नाही, राज ठाकरेंची टोलेबाजी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 30, 2019 05:40 PM IST

ताज्या बातम्या