Home /News /videsh /

जगात 6 आठवड्यात Corona रुग्णांमध्ये दुप्पट वाढ, WHO ने बोलावली आणीबाणीची बैठक

जगात 6 आठवड्यात Corona रुग्णांमध्ये दुप्पट वाढ, WHO ने बोलावली आणीबाणीची बैठक

कोरोना विषाणूचं संक्रमण पसरत असून याला 7 महिन्यांचा अवधी उलटला आहे. यादरम्यान 4 वेळा जागतिक आरोग्य संघटनेच्या कमिटीमार्फत मूल्यांकन करण्यात आले आहे.

कोरोना विषाणूचं संक्रमण पसरत असून याला 7 महिन्यांचा अवधी उलटला आहे. यादरम्यान 4 वेळा जागतिक आरोग्य संघटनेच्या कमिटीमार्फत मूल्यांकन करण्यात आले आहे.

या बैठकीनंतर WHO कुठली मार्गदर्शक तत्वे जाहीर करतं याकडे सर्व जागचं लक्ष लागलं आहे.

  जिनिव्हा 27 जुलै: जगात कोरोना व्हायरसचं थैमान थांबण्याचं नावच घेत नाही. गेल्या 6 आठवड्यांमध्ये रुग्णांच्या संख्येत दुप्पट वाढ झाल्याने जागतिक आरोग्य संघटनेने आणीबाणीची बैठक बोलावली आहे. गुरुवारी ही बैठक होणार आहे. जगात 1 कोटी 60 लाख रुग्णांची संख्या झाली आहे. त्यात 6 लाख 53 हजारांपेक्षा जास्त लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. WHOचे प्रमुख टेड्रोस अदनोम घेब्रेयसस यांनी ही बैठक बोलावली आहे. त्या बैठकीत जगातल्या कोरोना स्थितीचा आढावा घेतला जाणार आहे. WHOने कोरोनाला जागतिक महामारी घोषीत करण्यालाही आता 6 महिने होत असून त्या पार्श्वभूमीवर ही बैठक होत आहे. या आजाराने जगातल्या देशांना आणि लोकांना जवळही आणलं आणि दूरही केलं. या आजाराने सगळं जगचं आता बदलून गेलं आहे असंही टेड्रोस यांनी म्हटलं आहे. या बैठकीनंतर WHO कुठली मार्गदर्शक तत्वे जाहीर करतं याकडे सर्व जागचं लक्ष लागलं आहे. अमेरिकेत 1 लाख 50 हजारांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला असून. रिकव्हरी रेट 47.69 एवढा आहे. जगात ज्या देशांचा रिकव्हरी रेट उत्तम आहे अशा देशांमध्ये भारताचा समावेश होतो. भारताची टक्केवारी ही 64.25 एवढी आहे. जगाची रुग्ण बरे होण्याची सरासरी 61.20 टक्के एवढी आहे. त्या सरासरीपेक्षा भारताचं प्रमाण जास्त आहे. जगात 1 कोटी 65 लाख लोक कोरोनाबाधित आहेत. त्यात 57 लाखांपेक्षा जास्त लोकांवर सध्या उपचार सुरू आहेत. तर जगात 6 लाख 53 हजारांपेक्षा जास्त लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. COVID-19 रुग्णांसाठी Good News, टेस्टचा निकाल कळणार आता फक्त 36 मिनिटांमध्ये दरम्यान, जगभरात शंभरपेक्षा अधिक कोरोना लशी बनत आहेत. त्यापैकी काही लशी या ह्युमन ट्रायलच्या टप्प्यात आहे. त्यापैकी एक लस ह्यमुन ट्रायलच्या शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे आणि 30 हजार जणांना ही लस दिली जाणार आहे. अमेरिकेने तयार केलेली mRNA 1273 ही कोरोना लस. नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ हेल्थ अँड मॉडर्ना इंक (moderna inc) कंपनीने ही लस तयार केली आहे. मॉडर्नाच्या पहिल्या स्टेजच्या ट्रायलमध्ये 45 लोकांना ही लस देण्यात आली आहे. त्यावेळी या लोकांमध्ये रोगप्रतिकारक शक्तीमध्ये बचाव  दिसून आला होता. ताप आणि वेदनासारखे सौम्य दुष्परिणामही दिसून आले. फ्रान्सहून चीनचा ‘काळ’ येतोय; राफेलच्या उड्डाणाचा अंगावर काटा उभा राहणारा VIDEO आता ही लस 30,000 लोकांना दिली जाणार आहे. ज्या लोकांना ही लस दिली जाणार आहे, त्यांना खरी लस दिली जात आहे की डमी याबाबत माहिती देण्यात आलेली नाही. दोन डोस दिल्यानंतर त्याचा काय परिणाम होतो हे तपासलं जाणार आहे.
  Published by:Ajay Kautikwar
  First published:

  Tags: Coronavirus, Who

  पुढील बातम्या