नवी दिल्ली, 27 जुलै : चीन आणि पाकिस्तानसोबत सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर 5 राफेल विमान भारतात येण्यासाठी निघाले आहेत. फ्रान्सहून येणाऱ्या या फायटर जेट्सची भारतात येत असतानाही काही छायाचित्र आणि व्हिडीओ समोर आल्या आहेत. भारतीय वायुसेनेच्या सर्वात घातक फायटर जेट राफेलने भारतात येण्यासाठी निघाले आहेत. राफेल विमाने रवाना होण्यापूर्वी फ्रान्समध्ये भारतीय दूतावासांनी या राफेल विमाने आणि इंडियन एअरफोर्सच्या पायलटांचे छायाचित्र जारी केले आहेत. पाचही राफेल विमानं भारतात आणल्यानंतर अंबाला एअरबेस घेऊन जाणार असून तेथे यांना एअरफोर्समध्ये सामील करण्यात येईल. चीनच्या बॉर्डवर जशी स्थिती झाली आहे, ते पाहता राफेल येताच काम सुरू करण्यात येणार आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एका आठवड्यात मिशनअंतर्गत ही विमानं तयार करण्यात येतील.
राफेल फायटर जेटचं उड्डाण करण्यासाठी एकूण 12 पायलट्सना ट्रेनिंग देण्यात आली आहे. यापैकी काही राफेल भारतात आणणार आहेत. 29 जुलै रोजी ही विमानं भारतात दाखल होणार असल्याचे सांगितले जात आहे. राफेल 10 तासांचं अंतर पार केल्यानंतर संयुक्त अरब अमीरातमध्ये फ्रान्सच्या एअरबेस अलधफरा येथे लँड करेल. दुसऱ्या दिवशी राफेल अंबालाच्या दिशेने उड्डाण करेल.
"Beauty and the Beast"- #Rafale Fighter Aircraft. Ready to take off @MEAIndia @JawedAshraf5 @gouvernementFR @Dassault_OnAir @rajnathsingh @DefenceMinIndia @DDNewslive @ANI @DrSJaishankar @PMOIndia pic.twitter.com/TTAi6DHun7
— India in France (@IndiaembFrance) July 27, 2020
राफेल भारतीय वायू सेनाच्या 17 व्या Golden Arrows चा भाग बनेल. फ्रान्सहून यूएईच्या प्रवासादरम्यान राफेल विमान हवेत असताना इंधर भरणाऱ्या 2 refuler देखील येतील. राफेलला अधिकृतरित्या ऑगस्टमध्ये भारतीय वायुसेनेत दाखल केलं जाईल. हे वाचा- ड्रॅगन काही ऐकेना! अमेरिकेसोबत तणावादरम्यान दक्षिण चीन सागरात लाइव्ह फायर ड्रिल
राफेल विमान मीटोर एअर टू एअर मिसाइल्सने सुसज्ज असेल, ज्याची मार्क क्षमता 150 किमी आहे. हे सीमा पार न करताही शत्रू देशाची विमानं नष्ट करू शकतो. मीटोर एअर टू एअर मिसाइल्स अंबाला पोहोचल्या आहेत. चीन-पाकिस्तानकडे ही क्षमता नाही. राफेलमध्ये जे दुसरं मिसाइल असेल ते स्काल्प आहे. ज्याची मारक क्षमता 600 किमीपर्यंत असेल. चीनविरोधात सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर भारताने हॅमर मिसाइल्सही आपात्कालिन परिस्थितीत राफेलसाठी खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.