Coronavirusचा कहर! क्रूझवरील 2 प्रवाशांचा मृत्यू तर 8 भारतीयांना कोरोनाची लागण

Coronavirusचा कहर! क्रूझवरील 2 प्रवाशांचा मृत्यू तर 8 भारतीयांना कोरोनाची लागण

क्रूझवर 3711 प्रवासी प्रवास करत होते. त्यापैकी 600 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.

  • Share this:

टोकियो, 20 फेब्रुवारी: कोरोना व्हायरसने जगभरात हाहाकार पसरला आहे. जपानच्या सागरी तटावर उभ्या असलेल्या जहाजामधील कोरोगा व्हायरसची लागण झालेल्या दोन जणांचा मृत्यू झाला आहे. या क्रूझवर 3711 प्रवासी प्रवास करत होते. त्यापैकी 600 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये 138 भारतीय प्रवासीही होते त्यापैकी आतापर्यंत 8 जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळत आहे.

जगभरात कोरोना व्हायरसनं धुमाकूळ घातला असून चीनमध्ये कोरोना बाधित असणाऱ्या रुग्णांची संख्या कमी होण्याचं नाव घेत नाहीय.

हेही वाचा-BREAKING: जर्मनीच्या दोन वेगवेगळ्या बारमध्ये गोळीबार, 8 लोकांचा जागीच मृत्यू

कोरोना व्हायरची नव्यानं लागण झालेल्या लोकांची संख्या जवळपास 80 पर्यंत पोहोचल्याची माहिती मिळत आहे. भारतीय दुतावासने ट्विटरवर दिलेल्या माहितीनुसार कोरोना बाधित भारतीय प्रवाशांनी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. महिन्याच्या सुरुवातीला हे जहाज तटावर पोहोचले होते. मात्र कोरोनाची लागण झालेले काही प्रवासी असल्याची माहिती मिळाल्यानं ह्या जहाजावरील प्रवाशांना बाहेर काढले जात नव्हते. अमेरिकेनं त्यांच्या 340 नागरिकांना जपान सरकारसोबत चर्चा करून बाहेर काढलं असून त्यांना अमेरिकेला पुन्हा नेण्यात येणार आहे. दिवसेंदिवस कोरोना व्हायरसचा वाढता विळखा अधिक नागरिकांचे बळी घेत असल्याचं चित्र सध्या आहे. त्यामुळे जगभरात लोकांमध्ये कोरोनाची भीती आहे.

हेही वाचा-Coronavirus : महाराष्ट्रात 5 जण रुग्णालयात निरीक्षणाखाली, तुम्ही अशी घ्या काळजी

First published: February 20, 2020, 9:43 AM IST

ताज्या बातम्या