Coronavirus : महाराष्ट्रात 5 जण रुग्णालयात निरीक्षणाखाली, तुम्ही अशी घ्या काळजी

Coronavirus : महाराष्ट्रात 5 जण रुग्णालयात निरीक्षणाखाली, तुम्ही अशी घ्या काळजी

सध्या पाच जण निरीक्षणाखाली असून त्यातील दोन जण मुंबईत तर तीन जण सांगली येथे भरती आहेत.

  • Share this:

मुंबई, 17 फेब्रुवारी : राज्यात विविध रुग्णालयात निरीक्षणाखाली असलेल्या 64 जणांपैकी 60 जणांचा प्रयोगशाळा नमुना अहवाल कोरोना निगेटिव्ह आला आहे. 59 जणांना रुग्णालयातून सोडण्यात आले आहे. सध्या पाच जण निरीक्षणाखाली असून त्यातील दोन जण मुंबईत तर तीन जण सांगली येथे भरती आहेत.

बाधित भागातून राज्यात आलेल्या एकूण 220 प्रवाशांपैकी 138 प्रवाशांचा 14 दिवसांचा पाठपुरावा पूर्ण झाला आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. आतापर्यंत मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर 38 हजार 131 प्रवासी तपासण्यात आले आहेत. बाधित भागातून आलेल्या प्रवाशांचा शोध क्षेत्रीय सर्वेक्षणातूनही घेण्यात येत आहे.

ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात दि. 18 जानेवारी पासून पर्यंत 64 जणांना भरती करण्यात आले. आजपर्यंत भरती करण्यात आलेल्यापैकी 60 जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह असल्याचा निर्वाळा एन आय व्ही पुणे यांनी दिला आहे. 64 जणांपैकी 59 जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

मुंबईच्या GST भवनाची भीषण आग अखेर आटोक्यात, 300 कर्मचारी सुखरुप

मुंबई बंदरावर परवा दाखल झालेल्या फिलिपाईन्सच्या एम व्ही बौडिका या जहाजावरील (क्रूझ) एका फिलिपाईन नागरिकाला ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने त्याला या जहाजावरच विलगीकरण करण्यात आले. त्याचा प्रयोगशाळा नमुना कस्तुरबा मध्यवर्ती प्रयोगशाळा इथं पाठवण्यात आला आहे.

एम. व्ही. बौडिका या जहाजावर कुणीही भारतीय नसून कुणाला कसलीही लक्षणे नाहीत. हे जहाज काल पोरबंदरला पोहचले.

तुम्ही अशी घ्या काळजी

सर्दी, ताप, खोकला, घसा खवखवणे, श्वास घेताना त्रास, डोकेदुखी ही लक्षणं सर्वसामान्य वाटत असली तरी ती कोरोनाव्हायरसची लक्षणं असू शकतात. त्यामुळे अशी लक्षणं दिसताच दुर्लक्षणपणा करू नका, तात्काळ डॉक्टरांकडे जा. कोरोनाव्हायरसपासून वाचण्यासाठी हात स्वच्छ धुवा, शिंकताना आणि खोकताना तोंडासमोर रुमाल धरा, सर्दी-खोकला-तापाची लक्षणं दिसल्यास त्या व्यक्तीच्या जास्त संपर्कात राहू नका आणि शक्यतो प्राण्यांपासून दूर राहा.

दरम्यान, महाराष्ट्रात आतापर्यंत कोरोना व्हायरसचा धोका मोठ्या प्रमाणावर नाही. मात्र आपत्कालीन परिस्थिती उद्‌भवल्यास त्याला तोंड देण्यासाठी यंत्रणेने पूर्वतयारी केली आहे. कोरोना व्हायरसच्या रुग्णांसाठी मुंबईत कस्तुरबा आणि पुणे येथे नायडू रुग्णालयात विशेष वॉर्ड तयार करण्यात आले आहेत.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने 24X7 हेल्पलाइन नंबर जारी केला आहे. कोरोनाव्हायरसबाबत काहीही माहिती हवी असल्यास या हेल्पलाइनवर संपर्क साधावा, असं आवाहन केंद्र सरकारने केलं आहे.

First published: February 17, 2020, 7:19 PM IST

ताज्या बातम्या