जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / कोरोनाचं थैमान: देशातली ही 10 शहरं सर्वात धोकादायक, मुंबई सर्वात टॉपवर

कोरोनाचं थैमान: देशातली ही 10 शहरं सर्वात धोकादायक, मुंबई सर्वात टॉपवर

गुजरातमधल्या 27 जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत.

गुजरातमधल्या 27 जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत.

देशात मुंबई, पुणे, अहमदाबाद आणि इंदूर या शहरांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई 29 एप्रिल: सर्व देशात कोरोनाचं थैमान सुरूच आहेत. त्यात महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या दररोज वाढत आहे. गेल्या 24 तासांमध्ये 1813 नवे रुग्ण आढळून आलेत तर 71 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे देशात बाधितांची एकूण संख्या 31,787 झाली आहे तर मृत्यूचा आकडा 1008वर गेला आहे अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने आज दिली आहे. देशातल्या 10 महानगरांमध्ये पॉझिटिव्ह रुग्णांची 51 टक्क्यांपेक्षा जास्त संख्या आहे. तर मृत्यू झालेल्यांमध्ये या महानगरांमधलाच आकडा 63 टक्क्यांच्या वर जातो. या महानगरांमध्ये महाराष्ट्रातल्या मुंबई, ठाणे आणि पुणे यांचा समावेश होते. याबाबतचं वृत्त The Federal ने दिलं आहे. देशात मुंबई, ठाणे, पुणे, नवी दिल्ली, अहमदाबाद, इंदूर, जयपूर, चेन्नई आणि सुरत या शहरांमध्ये 14 हजार 551 पेक्षा जास्त कोरोबाधितांची संख्या आहे. देशात असलेल्या एकूण संख्येच्या ती 51 टक्यांपेक्षा जास्त होते. तर एकूण मृत्यूंपैकी तब्बल 562 मृत्यू या शहरांमध्ये झाले आहेत. त्याचं प्रमाणही 63 टक्क्यांपेक्षा जास्त होतं. देशात मुंबई, पुणे, अहमदाबाद आणि इंदूर या शहरांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. या शहरांमध्ये कोरोनाला रोखायचं कंसं यावर केंद्र आणि राज्य सरकार विचार करत असून अनेक उपाय योजना राबविण्यात येणार आहेत.   हे वाचा -   पुणेकरांना झालं तरी काय? कोरोना पीडितांच्या अंत्यसंस्कारास नागरिकांचा विरोध दरम्यान,  लॉकडाऊनमुळे अडकून पडलेल्या लाखो कामगार आणि मजुरांसाठी नरेंद्र मोदी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आता एका राज्यातून दुसऱ्या राज्यांमध्ये मजूर आणि कामगरांना जाता येणार आहे. या कामगारांना घेऊन जाण्याची व्यवस्था त्या त्या राज्यांनी करायची आहे. याबाबत गृहमंत्रालयाने आज एक आदेश काढला. त्यामुळे देशभरात अडकून पडलेले पर्यटक, विद्यार्थी, मजूर आणि कामगारांना आपापल्या घरी पोहोचण्याचा मार्ग मोकळा झालाय. निघतांना या मजुरांची मोडिकल चाचणी व्हावी आणि त्यांना कोरोनाची कुठलीही लक्षणं आढळली नाहीत तर त्यांना जाण्याची परवानगी देण्यात येणार आहे. हे लोक त्या गावी गेल्यानंतर त्यांची तिथेही टेस्ट होणार असून त्यांना होम क्वारंटाइन करण्यात येणार आहे.  हे वाचा -   Make In Indiaच्या जोरावर चीनला टक्कर, भारतच स्वबळावर कोरोनाला हरवणार या लोकांना ज्या बसमधून येण्यात येणार आहे त्या बसेस सॅनिटाइज करण्यात याव्यात असंही गृहमंत्रालयाने म्हटलं आहे. देशभर विविध राज्यांमधले मजुर अडकून पडले आहेत. त्यांना आता घरी जाता येणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात