Home /News /videsh /

सावध राहा! कोरोनाचा दुसरा टप्पा असू शकतो जास्त धोकादायक, WHOचा इशारा

सावध राहा! कोरोनाचा दुसरा टप्पा असू शकतो जास्त धोकादायक, WHOचा इशारा

तर देशात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे 63.54 एवढं आहे. मृत्यू दर आणि बरे होण्याचं प्रमाण हे इतर देशांच्या तुलनेत चांगलं आहे.

तर देशात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे 63.54 एवढं आहे. मृत्यू दर आणि बरे होण्याचं प्रमाण हे इतर देशांच्या तुलनेत चांगलं आहे.

'पहिला टप्पा झाल्यानंतर अनेक देशांमध्ये आता कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत आहे. मात्र यावर समाधान न मानता सगळ्यांनी उपाययोजना सुरूच ठेवल्या पाहिजे.

  न्ययॉर्क 26 मे: कोरोनाची सुरुवात होऊन आता पाच महिने झाले आहेत. जगात कोरोनाने हाहाकार माजलाय. चीन, इटली, स्पेन, इराण, अमेरिकेनंतर आता भारत आणि ब्राझील सारख्या देशांमध्ये कोरोनाने विक्राळ रुप धारण केलंय. तर पहिला फेरी झाल्यानंतर अनेक देशांमध्ये कोरोनाचा वेग मंदावला आहे. मात्र त्यावरच समाधानी न राहता दक्षता घ्या कारण दुसरा टप्पा आणखी धोकायदायक असून शकतो असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेचे तज्ज्ञ माइक रेयान यांनी म्हटलं आहे. रेयान म्हणाले, पहिला टप्पा झाल्यानंतर अनेक देशांमध्ये आता कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत आहे. मात्र यावर समाधान न मानता सगळ्यांनी उपाययोजना सुरूच ठेवल्या पाहिजे तरच कोरोनाला रोखता येईल असा इशारही त्यांनी दिला. कोरोनाव्हायरसनं जगात थैमान घातले आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना अद्याप यावर कोणतीही लस किंवा औषध मिळालं नाही आहे. या सगळ्यात शास्त्रज्ञांनी आता आणखी एका व्हायरसचा जगाला धोका असल्याचे संकेत दिले आहेत. चीनमधील एक प्रमुख व्हायरोलॉजिस्टने नवीन व्हायरसच्या हल्ल्याबाबत सांगितले आहे. पंतप्रधानांची Live मुलाखत सुरू असतानाच भूकंपाचा धक्का, नंतर काय झालं पाहा VIDEO
   चीनच्या संदिग्ध संस्था वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीचे उपसंचालक  झेंगली यांनी चीनच्या सरकारी टेलिव्हिजनवर बोलताना नवीन व्हायरसबाबत इशारा दिला आहे.
  डेली मेलच्या वृत्तानुसार झेंगली यांनी वटवाघुळात असलेल्या कोरोनाव्हायरसवर संशोधन केले होते. याच कारणास्तव त्यांना चीनची 'बॅट व्हुमन' म्हणून ओळख आहे. शी झेंगली यांनी व्हायरसबाबत केलेल्या संशोधनावर सरकार आणि वैज्ञानिकांनी पारदर्शक राहिले पाहिजे, असे सांगितले. तसेच, विज्ञानाचे राजकारण केले जाते तेव्हा ते फार वाईट असते, अशी खंतही बोलून दाखवली. 'या' देशाची कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल; आता रुग्णालयात राहिला फक्त एक कोरोना सीसीटीएनशी बोलताना शी झेंगली यांनी, जर आपल्याला पुढील संक्रमक आजारापासून वाचायचं असेल तर जास्तीत जास्त माहिती गोळा करावी लागेल. प्राण्यांमध्ये असलेल्या इतर अज्ञात व्हायरसबाबत माहिती करून घ्यावी लागेल.
  Published by:Priyanka Gawde
  First published:

  पुढील बातम्या