वेलिंग्टन, 11 ऑगस्ट : कोरोनाला आपल्या देशातून हद्दपार केल्यानंतर आता न्यूझीलँडमध्ये कोरोनाव्हायरसची (New Zealand coronavirus) पुन्हा एंट्री झाली आहे. तब्बल 102 दिवसांनंतर न्यूझीलंडमध्ये कोरोनाचे नवे रुग्ण आढळले आहेत. ऑकलँड शहरामध्ये कोरोनाच्या चार नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. यानंतर संपूर्ण शहर लॉकडाऊन करण्यात आलं आहे. हाताच्या बोटावर मोजता येतील असे देश आहेत ज्यांनी कोरोनावर मात केली आहे. न्यूझिलंड हा त्यापैकी एक देश आहे. 100 दिवसात इथे कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नव्हता. मात्र आता नवे रुग्ण आढळून आले आहेत. विशेषत: त्यांना कोरोनाची लागण कशी झाली याचा स्रोत माहिती नाही, त्यामुळे चिंता वाढली आहे.
आरोग्य महासंचालक अॅश्ले बुमफिल्ड म्हणाले, "दक्षिण ऑकलँडमधील एका कुटुंबातील चार जणांना कोरोनाचं निदान झालं आहे. त्यापैकी एका रुग्णाचं वय पन्नास आहे. या कुटुंबातील कोणत्याही सदस्याने परदेशात प्रवास केल्याचा इतिहास नाही. त्यांना कोरोनाची लागण कुठून झाली याचा तपास सध्या सुरू आहे" हे वाचा - शाळा सुरू करणं पडलं महागात! फक्त 2 आठवड्यात तब्बल 97 हजार विद्यार्थ्यांना कोरोना पंतप्रधान जेसिंडा अर्डर्न म्हणाल्या, "खबरदारी म्हणून ऑकलँडमध्ये पुन्हा बंधनं घालण्यात आली आहे. शहरातील लोकांनी ऑफिस, शाळेत जाऊ नये. तसंच 10 पेक्षा जास्त लोकांनी एकत्र जमण्यावर पुन्हा निर्बंध घालण्यात आले आहेत. व्हारसचा स्रोत माहिती नसल्याने आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे"New Zealand locks down biggest city after first local case of coronavirus in 102 days https://t.co/n0MjB6qqSj pic.twitter.com/S7I8Ustpwv
— Reuters (@Reuters) August 11, 2020
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus