फक्त 2 आठवड्यात तब्बल 97 हजार विद्यार्थ्यांना कोरोना; शाळा सुरू होण्याआधीच धक्कादायक आकडेवारी
जवळपास सहा महिन्यांपासून बंद असलेल्या शाळा सुरू करण्याचा विचार सरकार करत आहे.
|
1/ 6
कोरोना लॉकडाऊनमुळे जवळपास सहा महिने शाळा बंद आहेत. लॉकडाऊन हळूहळू शिथील केला जातो आहे. अशात शाळाही आता सुरू करण्याचा विचार केंद्र सरकार करत आहेत.
2/ 6
भारतात शाळा सुरू करण्याचा विचार सुरू आहे, तर अमेरिकेत काही शाळा सुरू झाल्या आहेत. त्याआधीच झालेल्या सर्वेक्षणात धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.
3/ 6
मिरर यूकेच्या रिपोर्टनुसार शाळा सुरू होण्याआधीच फक्त 2 आठवड्यात 97,000 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे.
4/ 6
अमेरिकेत एकूण 338,000 मुलांना कोरोना लागण झाली आहे, त्यापैकी जुलैच्या शेवटच्या दोन आठवड्यातच 97,000 मुलांना कोरोना झाला.
5/ 6
अमेरिकन अकॅडमी ऑफ पीडियाट्रिक्सने 16 जुलै ते 30 जुलै आकडेवारीचा रिपोर्ट जारी केला आहे.
6/ 6
याआधी इज्राइललाही शाळा सुरू करण्याचा निर्णय महागात पडला. कोरोनाव्हायरसची प्रकरणं कमी होताच या देशाने शाळा सुरू केल्या आणि 261 जण कोरोना संक्रमित झालेत. त्यामुळे 6800 मुलांना क्वारंटाइन करण्यात आलं.