**नवी दिल्ली, 22 मार्च :**कोरोनाव्हायरस (Coronavirus) संपूर्ण जगभर पसरला आहे. खोकला, ताप, अशी लक्षणंही (symptoms) कोरोनाव्हायरसची आहेत. त्यामुळे कुणीही खोकलं तरी प्रत्येकाला त्याची भीती वाटते. साधा खोकला, ताप आला तरी आपल्याला कोरोनाव्हायरस तर झाला नाही, अशी शंका मनात येते. मात्र कोरोनाव्हायरसची इतकीच लक्षणं नाहीत. कोरोनाव्हायरस झाल्यानंतर नेमकं काय होतं, हा अनुभव एका कोरोनाग्रस्त ट्विटर युझरने (Twitter User) सोशल मीडियावर (Social Media) शेअर केला आहे. 22 वर्षांच्या बिजोंडा हलीतीला (Bjonda Haliti) कोरोनाव्हायरस आहे. कोरोनाव्हायरसबाबत लोकांना माहिती व्हावी आणि त्याबाबत लोकांच्या मनातील गैरसमज राहू नयेत, यासाठी तिनं ट्विटवर आपला अनुभव शेअर करण्याचा निर्णय घेतला आणि लोकांच्या मनातील भीतीही दूर करण्याचा प्रयत्न केला आहे.
I’m 22 years old and I tested positive for COVID-19.
— Bjonda Haliti (@baeonda) March 18, 2020
I’ve been debating on posting, but I want to share my experience especially with those around my age to help bring awareness, and to relieve any stress/anxiety some may have due to the pandemic.
बिजोंडाने अगदी तिला झालेला कोरडा खोकला ते कोरोनाव्हायरसचं निदान यापर्यंत प्रत्येक दिवस तिचा कसा होता, हे सांगितलं आहे.
Day 2: I felt a lot of pressure in my head to the point I would have to cough softly to avoid the discomfort. That night, I experienced the chills and had a fever. One main symptom that stood out to me, my eyes physically hurt. They were tender and sore.
— Bjonda Haliti (@baeonda) March 18, 2020
पहिला दिवस - सुरुवातील बजोंडाला कोरडा खोकला होता, घशात थोडीशी खवखव वाटत होती. शिवाय थकवाही होता. दुसरा दिवस - डोकं जड झालं, सोबतच थंडी आणि तापही होता. सर्वात महत्त्वाचं लक्षण म्हणजे डोळ्यांमध्ये वेदना आणि तोंडात कडवट चव होती. तिसरा दिवस - तिसरा संपूर्ण दिवस बजोंडाने झोपून काढला कारण तिची शारीरिक शक्ती कमी झाली होती आणि ताप खूप वाढला होचा. सोबतच कोरडा खोकला, तीव्र डोकेदुखी, थंडी लागण आणि भीतीही वाटत होती. हे वाचा - ‘एकतर भारताचं चीन होईल किंवा इटली’, कोरोनाबाबत शास्त्रज्ञांनी व्यक्त केली भीती अखेर बजोंडा डॉक्टरकडे गेली. त्यावेळी तिला फ्लू किंवा स्ट्रेप असं काही नसल्याचं सांगितलं आणि अँटिबायोटिक्स घेण्याचा सल्ला दिला. चौथा दिवस - चार दिवसांनी बजोंडाचा ताप पूर्णपणे गेला, मात्र इतर लक्षणं दिसून आली. श्वास घेण्यात समस्या जाणवू लागली. बजोंडा म्हणाली, “मला माझ्या छातीवर एक मोठा दगड ठेवल्यासारखं वाटत होतं. शेवटी कोरोनाव्हायरस टेस्ट करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांनी स्वतला बंदिस्तही करून घेतलं आणि रिपोर्टची प्रतीक्षा केली आणि कोरोनाव्हायरस असल्याचं निदान झालं. शिवाय एका विशिष्ट गटाला कोरोनाव्हायरसचा धोका आहे, असं सांगितलं जातं. मात्र 22 वर्षांच्या बीजोंडाने आपल्याला दुसरा कोणताही आजार नाही, तसंच आपण धूम्रपान करत नसल्याचंही तिनं स्पष्ट केलं. बीजोंडावर उपचार सुरू असून, तिची तब्येत आता सुधारते आहे. नागरिकांनी काळजी घ्यावी आणि सोशल डिस्टेंसिंग ठेवावं असं आवाहनही तिनं केलं आहे. हे वाचा - डोळ्यांदेखत मृत्यू पाहिला पण…, कोरोनावर मात केलेल्या रुग्णाची डायरी आली समोर