'एकतर भारताचं चीन होईल किंवा इटली', कोरोनाबाबत शास्त्रज्ञांनी व्यक्त केली भीती

'एकतर भारताचं चीन होईल किंवा इटली', कोरोनाबाबत शास्त्रज्ञांनी व्यक्त केली भीती

देशातील परिस्थिती पाहता एकतर भारत चीनप्रमाणे (china) व्हायरसवर नियंत्रण मिळवू शकेल किंवा भारताची अवस्था इटलीप्रमाणे (Italy) होईल, अशी शक्यता शास्त्रज्ञांनी वर्तवली आहे.

  • Share this:

चेन्नई, 21 मार्च : भारतात (India) कोरोनाव्हायरसची (Coronavirus) प्रकरणं वाढत आहेत. सरकार त्यावर नियंत्रणासाठी झटत आहे. देशातील परिस्थिती पाहता एकतर भारत चीनप्रमाणे (china) व्हायरसवर नियंत्रण मिळवू शकेल किंवा भारताची अवस्था इटलीप्रमाणे (Italy) होईल, अशी शक्यता शास्त्रज्ञांनी वर्तवली आहे.

कोरोनाव्हायरसच्या प्रसाराबाबत अभ्यास करणाऱ्या दोन शास्त्रज्ञांनी न्यूज 18 ला दिलेल्या मुलाखतीत अशी भीती व्यक्त केली आहे. यापैकी एक वैज्ञानिक हे सरकारसोबत काम करत आहेत.

वैज्ञानिक म्हणाले, भारताने एका कठीण टप्प्यात प्रवेश केलेला आहे. अशावेळी भारताबाबत 2 परिस्थिती समोर आहेत. एक तर Social Distancing आणि (Self Quarantine करून चीनप्रमाणे आजाराच्या प्रसारावर नियंत्रण मिळवण्यात यशस्वी ठरेल आणि तसं नाही झालं तर इटलीसारखी परिस्थिती होईल आणि देशाची आरोग्यव्यवस्थाच कोलमडेल. त्यामुळे 2 ते 3 आठवडे भारतासाठी महत्त्वाचे आहेत.  भारतात पुढील 2 ते 3 आठवडे कोरोनाव्हायरसची प्रकरणं 415 ते 1000 या दरम्यान जाऊ शकतात, असा अंदाज त्यांनी वर्तवला आहे.

हे वाचा -  फक्त 24 तासांत तब्बल 98 रुग्ण, भारतातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या पोहोचली 298 वर

जागतिक आरोग्य संघटना आणि अमेरिकेच्या जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटीच्या अहवालावरून हे अंदाज वर्तवले जात आहेत. या अहवालानुसार मॉडेल तयार करण्यात आलेत. या मॉडेल्सच्या आधारे इतर देशांमधील व्हायरसचा प्रसार किती आहे, हे तपासण्यात आलं आणि त्यानुसार संभाव्य प्रकरणांचा अंदाज बांधण्यात आला आहे.

चेन्नईच्या मॅथेमेटिकल सायन्सेसचे प्राध्यापक सीताभ्र सिन्हा यांनी सांगितलं की, "भारतात ज्याप्रमाणे हा आजार पसरतो आहे, त्याचा विचार करत मार्च अखेरपर्यंत कोरोनाव्हायरसची प्रकरणं 1000 पर्यंत पोहोचू शकतात"

चेन्नईतील मॅथेमेटिकल इन्स्टिट्युटचे असोसिएस प्रोफेसर सौरिश दास यांनी ट्रान्सफर लर्निंग या पद्धतीचा अवलंब केला आहे. यामार्फत इटली, चीन आणि कोरोनाव्हायरसमुळे प्रभावित झालेल्या इतर सर्व देशांमध्ये व्हायरसचा प्रसार कसा झाला ते पाहून भारतातील परिस्थितीचा अंदाजा घेऊन समांतर अभ्यास केला जातो आहे.

हे वाचा - Alert ! महाराष्ट्र Coronavirus च्या तिसऱ्या टप्प्याच्या उंबरठ्यावर

दास यांनी News 18 ला ई-मेल मार्फत दिलेल्या एका उत्तरात म्हटलं, "जर समजा चीनप्रमाणे भारतातही हा आजार पसरला आणि चीनप्रमाणेच सेल्फ क्वारंटाईन आणि इतर पावलं उचलली, तर चीनप्रमाणे भारतातही आपल्याला यश मिळेल. जर असं झालं तर भारतात 15 एप्रिलपर्यंत फक्त 4`5 प्रकरणं दिसतील, असा अंदाज आहे. मात्र जर भारत या आजाराच्या प्रसारावर नियंत्रण मिळवू शकलं नाही तर इटलीच्याच मार्गावर जाईल. 15 एप्रिलपर्यंत प्रकरणं 3,500 पेक्षाही जास्त वाढू शकतील"

भारतात आतापर्यंत 283 कोरोनाव्हायरसचे रुग्ण आढळलेत. 4 जणांचा मृत्यू झाला आहे. आजाराचा प्रभाव, त्यामध्ये येणारी कमी, सोशल डिस्टेंसिंग आणि क्वारंटाईन यावर आता भारतातील पुढील परिस्थिती अवलंबून आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 21, 2020 06:01 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading