• Home
 • »
 • News
 • »
 • videsh
 • »
 • लसीलाही न जुमानणाऱ्या कोरोनाच्या Mu व्हेरिएंटनं वाढवली जगाची चिंता, WHO नं दिला गंभीर इशारा

लसीलाही न जुमानणाऱ्या कोरोनाच्या Mu व्हेरिएंटनं वाढवली जगाची चिंता, WHO नं दिला गंभीर इशारा

कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) सावटामध्ये जग येऊन आता दीड वर्ष उलटलं आहे. जगभर लसीकरण अभियान जोरात सुरु आहे. तरीही या व्हायरसचे नवे व्हेरिएंट (Covid Variant) समोर येत आहेत.

 • Share this:
  मुंबई, 2 सप्टेंबर : कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) सावटामध्ये जग येऊन आता दीड वर्ष उलटलं आहे. जगभर लसीकरण अभियान जोरात सुरु आहे. तरीही या व्हायरसचे नवे व्हेरिएंट (Covid Variant) समोर येत आहेत. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननं (WHO) एका नव्या व्हेरिएंटबद्दल इशारा दिल्यानं जगाची चिंता वाढली आहे. कोलंबिया देशाती म्यू  (Mu Variant) व्हेरिएंटबद्दल जागतिक आरोग्य संघटनेकडून हा इशारा देण्यात आला आहे.  B.1.621 या व्हेरिएंटचे हे दुसरे नाव आहे. याच्याशी संबंधीत 40 देशातून 4 हजार पेक्षा जास्त पेशंट्स समोर आली आहेत. म्यू व्हेरिएंटवर हा कोरोना व्हॅकिसनचा  (Vaccine) प्रभाव होत नाही, असा इशारा आरोग्य संघटनेनं दिला आहे. याची गंभीरता शोधण्यासाठी आणखी अभ्यासाची गरज असून WHO नं याचं वर्णन 'व्हेरिएंट ऑफ इंटरेस्ट' असं केलं आहे. आरोग्य संघटनेच्या रिपोर्टनुसार, 'म्यू व्हेरिएंटची पहिली केस जानेवारी 2021 मध्ये कोलंबियात समोर आली. त्यानंतर दक्षिण अमेरिका आणि युरोपातील देशांमध्येही याचा प्रसार झाला असून तिथंही या संबंधीचे पेशंट्स आढळले आहेत. सध्या या व्हेरिएंटचा अधिक प्रसार झाल्याची कोणतीही माहिती नाही. VIDEO : ऑनलाइन बैठकीदरम्यान मुलाने केलं असं कृत्य; महिला मंत्रीला सर्वांसमोर मागावी लागली माफी व्हेरिएंट म्हणजे काय? कोणत्याही व्हायरसचा एक जेनिटिक कोड असतो. त्यामध्ये सतत लहान-लहान बदल होत असतात. यामधील बहुतेक बदलांचा परिणाम होत नाही. पण काही बदलांमुळे तो व्हायरस अधिक वेगानं पसरतो आणि घातक बनतो. या व्हायरसमधील बदलांना व्हेरिएंट म्हणतात. ब्रिटन आणि दक्षिण आफ्रिकेत या प्रकारचे कोरोना व्हायरसचे व्हेरिएंट आढळली आहेत. ती व्हेरिएंट घातक समजली जातात.
  Published by:News18 Desk
  First published: