म्हणे ‘कोरोना म्हणजे अल्लाहने दिलेली शिक्षा’; त्याच धर्मगुरूला व्हायरसने घातला विळखा

म्हणे ‘कोरोना म्हणजे अल्लाहने दिलेली शिक्षा’; त्याच धर्मगुरूला व्हायरसने घातला विळखा

मुस्लिमांना नजरकैदेत ठेवणाऱ्या चीनला अल्लाहने कोरोनाव्हायरसची (Coronavirus) शिक्षा दिली, अशी टीका या धर्मगुरुने केली होती.

  • Share this:

तेहरान 16 मार्च : कोरोनाव्हायरसने (Coronavirus) जगभर थैमान घातलं आहे. 100 पेक्षा जास्त देशात या व्हायरसने आपले हातपाय पसरलेत, 5 हजारांहून अधिक लोकांचा बळी घेतला आणि 1 लाखाहून अधिक लोकांना विळखा घातला. या परिस्थितीतही काही जण विचित्र अशा प्रतिक्रिया देत आहेत. अशीच प्रतिक्रिया देणाऱ्या मुस्लिम धर्मगुरूलाच कोरोनाव्हायरसची लागण झाली आहे.

'कोरोनाव्हायरसचा प्रादुर्भाव म्हणजे अल्लाहने चीनला दिलेली शिक्षा आहे', असं वक्तव्य इराकमधील शिया नेते आणि मुस्लिम धर्मगुरू हादी अल मोदारीस (Iraqi Islamic Scholar Hadi Al-Modarres) यांनी केलं होतं. काही दिवसांपूर्वीच त्यांच्या या व्यक्तव्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.

'चीनमधील अत्याचारी प्रशासनाने 10 लाखांहून अधिक मुस्लिमांना नजरकैदेत ठेवलं होतं. त्यामुळे या चीनी लोकांना शिक्षा देण्यासाठी अल्लाहने हा विषाणू पाठवला आणि आज चीनमधील 40 लाख लोकं नजरकैदेत आहेत. ज्या नकाबची ते मस्करी करत होते आज तेच त्यांना घालावे लागत आहे. अल्लाहने देशातील सरकारी यंत्रणा आणि अधिकाऱ्यांच्या माध्यमातून स्त्रीच नाही तर पुरुषांनाही नकाब घालण्यास भाग पाडलं,” असं मोदारीस  म्हणाले होते.

मोदारीस यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी त्यांच्यावर टीका केली होती. मात्र मोदारीस यांनी हे वक्तव्य केल्यानंतर काही दिवसांनंतर त्यांनाच करोनाव्हायरसची लागण झाल्याचे स्पष्ट झालं. त्यावरूनही अनेकांनी त्यांना ऐकवलं आहे.

हे वाचा - हे फक्त आपल्याच देशात होऊ शकतं! 'कोरोना'शी दोन हात करणाऱ्या मोदी सरकारला सॅल्युट

First published: March 16, 2020, 2:05 PM IST

ताज्या बातम्या