रांची 23 ऑगस्ट: कोविड रुग्णांवर उपचारासाठी सर्व देशभर सेंटर्स तयार करण्यात आले आहेत. त्या सेंटर्समध्ये राहण्याबाबत सरकारने काही नियम तयार केले आहेत. मात्र एका घटनेने झारखंड सरकार आणि पोलिसांची अब्रू चव्हाट्यावर आली आहे. आरोपी दारु पार्टी करत असतांनाचे फोटो व्हायरल झाल्यानंतर मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहे.
धनबादमधल्या कोविड सेंटरमधली ही घटना आहे. या आरोपीच्या हातात बेड्या आहेत. मात्र तो राजरोसपणे दारु पितांना दिसत आहे. हा आरोपी पार्टी करत असतांना पोलीस कुठे होते असा प्रश्न आता विचारला जात आहे.
तर राज्य सरकारने एक चौकशी समिती तयार केली असून दोषी आढळणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल असं मुख्यमंत्री सोरेन यांनी म्हटलं आहे.
.@dc_dhanbad कृपया उक्त मामले की सत्यता की जाँच कर संलिप्त लोगों पर कार्यवाई करते हुए सूचित करें।@BannaGupta76 जी, कृपया संज्ञान लें।@JharkhandPolice @dhanbadpolice https://t.co/4BEqOpgiDS
— Hemant Soren (घर में रहें - सुरक्षित रहें) (@HemantSorenJMM) August 23, 2020
दरम्यान, WHO च्या नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार, 12 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांनीही प्रौढांसारखे मास्क घालावे. संयुक्त राष्ट्रांच्या एजन्सीने म्हटले आहे की मास्क घालण्यासाठी जगभरात जारी केलेली मार्गदर्शक तत्त्वे 12 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांनाही लागू आहेत. WHOने दिलेल्या माहितीनुसार, 12 वर्षापेक्षा जास्त वयाच्या मुलांना मोठ्यांप्रमाणे कोरोनाचा धोका जास्त असतो.
जेथे सोशल डिस्टन्सिंग पाळले जात नाही अशा ठिकाणी किंवा कोरोनाचा संसर्ग झपाट्याने पसरत असलेल्या ठिकाणी मुलांनीही मास्क घालावे. WHOने मुलांना कोरोना संसर्गाचा धोका अधिक असल्याचेही सांगितले होते. WHOच्या मते, 12 वर्षांपेक्षा जास्त वयाची मुले प्रौढांप्रमाणे कोरोना पसरवू शकतात. तर, 5 वर्षाखालील मुलांना मास्क घालणे अनिवार्य नाही.