कोरोनामुळं अमेरिका पुन्हा हादरलं! प्रत्येक तासाला 42 लोकांचा मृत्यू, आकडा पोहचला 61 हजारांवर

कोरोनामुळं अमेरिका पुन्हा हादरलं! प्रत्येक तासाला 42 लोकांचा मृत्यू, आकडा पोहचला 61 हजारांवर

अमेरिकेत गेले तीन दिवस मृतांचा आकडा कमी झाला होता. मात्र आता पुन्हा मृतांच्या संख्येत वाढ झाली आहे.

  • Share this:

वॉशिंग्टन, 30 एप्रिल : कोरोनामुळं अमेरिकेत हाहाकार माजला आहे. दिवसेंदिवस मृतांच्या संख्येत वाढ होत आहे. सध्या अमेरिकेत सर्वात जास्त मृतांची संख्या आहे. गेल्या 24 तासांत तब्बल 2 हजार 502 लोकांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेच्या जॉन हॉप्किन्स विद्यापीठानं दिलेल्या आकडेवारीनुसार गेले तीन दिवस मृतांचा आकडा कमी झाला होता. मात्र आता पुन्हा मृतांच्या संख्येत वाढ झाली आहे. आतापर्यंत अमेरिकेत जवळजवळ 61 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे.

बुधवारीच्या (29 एप्रिल) रिपोर्टनुसार अमेरिकेत कोरोना संक्रमितांचा आकडा हा 10 लाखांपेक्षा जास्त होता. दरम्यान काही राज्यांमध्ये कोरोनाबाधितांची आणि मृतांची संख्या कमी झाली आहे. मात्र न्यूयॉर्कमध्ये अजूनही परिस्थिती भयावह आहे. मात्र अशा परिस्थितीतही काही राज्यांनी आपली अर्थव्यवस्था पुन्हा सुरू करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

वाचा-धारावीत अन्नवाटप करणाऱ्या मुंबई पालिकेच्या अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व्हाईट हाऊसमध्ये जनतेला संबोधित करताना म्हणाले की, 'आम्ही मृतांबरोबरच आपल्या प्रियजनांना गमावलेल्या अमेरिकन लोकांसाठीही प्रार्थना करत राहू. यापूर्वी असे कधी झाले नव्हते. आम्ही मनापासून दु: खी आहोत पण आपण हिम्मतीनं याचा सामना करू, आपण कमबॅक करू, पुन्हा जोमानं परत येऊ''. मंगळवारी अमेरिका हा जगातील पहिला देश ठरला आहे जिथे कोरोना विषाणूची प्रकरणे 10 लाखांवर गेली आहेत. जगभरातील 31 लाख प्रकरणांपैकी अमेरिकेत एक तृतीयांश प्रकरणे आहेत.

वाचा-3 मेनंतर 'या' परिसरात मिळणार सूट, गृह मंत्रालयानं दिले संकेत

लॉकडाऊनबाबत ट्रम्प असेही म्हणाले की, "तज्ञांचा असा विश्वास आहे की या जागतिक रोगाचा सर्वात वाईट टप्पा निघून गेला आहे आणि अमेरिका पुन्हा सुरक्षित आणि जलदगतीने पुन्हा सुरू करण्यासाठी उत्सुक आहेत". दरम्यान सध्या अमेरिकेतील न्यूयॉर्क शहर कोरोनाचं केंद्रबिंदू ठरलं आहे. अमेरिकेतील 30 टक्के कोरोना रुग्ण एकट्या न्यूयॉर्क शहरांत आहेत. तर न्यू जर्सी, मॅसेच्युसेट्स, कॅलिफोर्निया आणि पेनसिल्व्हानियामध्ये सर्वाधिक रुग्ण आहेत.

वाचा-कोरोनावर ओषध येणार,अमेरिकन कंपनीचा दावा; तीसऱ्या टप्प्यातल्या ट्रायल यशस्वी

संपादन, संकलन-प्रियांका गावडे

First published: April 30, 2020, 9:15 AM IST

ताज्या बातम्या