वॉशिंग्टन, 08 एप्रिल : अमेरिकेसारख्या महासत्ता देशाचे कोरोनाने कंबरडे मोडले आहे. अमेरिकेत प्रत्येक 2 मिनिटाला एकाचा मृत्यू होत आहे. परिस्थिती एवढी वाईट आहे की, लोकांवर उपचार करण्यासाठी डॉक्टर उपलब्ध नाही आहेत. अमेरिकेत एकाच दिवसात 1970 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यामुळे आता अमेरिकेतील मृतांचा आकडा 12 हजार 878वर पोहचला आहे. तर, 4 लाख लोकांना कोरोनाची लागण झाली. यात न्यूयॉर्कमध्ये सर्वात जास्त मृत्यू झाले आहेत. चीनच्या वुहाननंतर कोरोनाने आता न्यूयॉर्कला आपले लक्ष केले आहे. न्य़ूयॉर्कमध्ये मृतांचा खच पडला आहे. न्यूयॉर्कमध्ये गेल्या 24 तासात तब्बल 731 लोकांचा मृत्यू झाला आहे. लोकांवर अंतिमसंस्कार करण्यासाठी आता जागा शिल्लक नाही आहे. त्यामुळं सध्या उद्यानात लोकांना दफन करण्यास सुरुवात केली आहे. वाचा- 3 हजार मृत्यू, 81 हजार लोकं संक्रमित! आज 76 दिवसांनी वुहान पार करणार लक्ष्मणरेखा न्यूयॉर्कमध्ये हाहाकार न्यूयॉर्कमध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे एकूण 3,202 लोकांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे, न्यूयॉर्क शहरात कोरोनामुळे बर्याच लोकांनी आपल्या नोकऱ्याही गमावल्या आहेत. त्यामुळे सरकारने 3 महिन्यांचे भाडे देईल, याशिवाय वर्षाकाठी एक लाख डॉलर्स (सुमारे 75 लाख रुपये) कमावणाऱ्यांना सरकार 1200 डॉलर (90 हजार रुपये), विवाहित लोकांसाठी 1.8 लाख रुपये आणि मूल असल्यास खात्यात अतिरिक्त 35 हजार जोडले जात असल्यास. मात्र लोकांना, शहरात कोणी जिवंतच राहिलं नाही तर, असा सवाल सरकारला केला आहे. वाचा- ब्रिटिश PM बोरिस जॉन्सन यांच्या प्रकृतीत सुधार, कोरोनाचा धोका टळला अनेक भारतीयांना कोरोनाची लागण, पत्रकाराचा मृत्यू अमेरिकेतील शेकडो भारतीयांना कोरोना विषाणूची लागण होण्याची लागण झाली आहे आणि त्यापैकी बर्याच जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. मृतांमध्ये भारतीय वृत्तसंस्थेचा माजी पत्रकारही आहे. अमेरिकेतील अनेक समुदाय संस्था आणि स्थलांतरित नेत्यांनी ही माहिती दिली आहे. किती भारतीयांना या विषाणूची लागण झाली आहे याबद्दल ठोस माहिती नसली तरी. सोशल मीडिया ग्रुपवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार न्यूयॉर्क आणि न्यू जर्सीमध्ये मोठ्या प्रमाणात भारतीय अमेरिकन लोक संक्रमित आहेत, असे सांगण्यात आले आहे. वाचा- Coronavirus चा धोका; चेहऱ्याला हात लावण्यापासून स्वत:ला कसं रोखाल? संपादन, संकलन-प्रियांका गावडे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.