ब्रिटिश PM बोरिस जॉन्सन यांच्या प्रकृतीत सुधार, कोरोनाचा धोका टळला

ब्रिटिश PM बोरिस जॉन्सन यांच्या प्रकृतीत सुधार, कोरोनाचा धोका टळला

बोरिस यांना सध्या ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आले असले तरी, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे.

  • Share this:

लंडन, 08 एप्रिल : ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना सोमवारी (6 एप्रिल) रोजी आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. बोरिस जॉन्सन यांना 10 दिवसांपूर्वीच कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्यानंतर त्यांनी स्वत:ला क्वारंटाइन केले होते. आता त्यांच्या प्रकृतीत सुधार झाली असून, स्थिर असल्याचे पंतप्रधान कार्यालयाने सांगितले आहे. त्यांना सध्या ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आले असले तरी, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे.

याआधी बोरिस यांना वैद्यकीय चाचणीसाठी रुग्णालयात नेण्यात आले होते, याबाबत त्यांनी स्वतः ट्वीट करून माहिती दिली होती. मुख्य म्हणजे पंतप्रधान बोरिस जॉन्सन रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी पंतप्रधानांच्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडून रुग्णालयात दाखल झाले. आता त्यांनी यासाठी परराष्ट्रमंत्री डोमॅनिक रॉब यांना पंतप्रधानपदाची कामे पार पाडण्यासाठी नियुक्त केले आहे.

बोरिस जॉन्सन लवकर बरे होण्यासाठी पंतप्रधान मोदींनी केली प्रार्थना

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील बोरिस जॉन्सन यांच्या प्रकृतीबाबत ट्विट केले होते. मोदींनी, 'पंतप्रधान बोरिस जॉन्सन निश्चिंत राहा. मला आशा आहे की, तुम्ही लवकरच बरे व्हाल', असे ट्वीट केले. पंतप्रधान मोदी मित्र राष्ट्रांच्या प्रमुखांशी सतत संपर्कात असतात आणि कोरोना विषाणूविरूद्ध लढ्यात समर्थन देत आहेत.

जॉन्सन यांच्या गर्भवती पत्नीलाही आहे कोरोनाची लक्षणं

पंतप्रधान जॉन्सनची गर्भवती पत्नी कॅरी सायमंड्सही स्वत: ला क्वारंटाईन ठेवले आहे. रविवारी याबाबत माहिती देताना ते म्हणाले की, त्यांच्यामध्ये कोरोना विषाणूचीही लक्षणे आहेत. याक्षणी त्या विश्रांती घेत आहे आणि पूर्वीपेक्षा त्यांची प्रकृती चांगली आहे. कॅरीने गर्भवती महिलांसाठीदेखील माहिती शेअर केली आहे. त्यांनी लिहिले की, 'गरोदरपणा आणि कोविड -19 चिंताजनक आहे. इतर गर्भवती स्त्रिया कृपया नवीनतम मार्गदर्शक तत्त्वे वाचा आणि त्याचे अनुसरण करा. ज्या मला अगदी योग्य वाटल्या'. सध्या युरोप आणि अमेरिकेत कोरोनाचा प्रार्दुभाव इतर देशांच्या तुलनेत जास्त आहे.

संपादन, संकलन-प्रियांका गावडे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 8, 2020 08:34 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading