Home /News /national /

एक आनंददायी बातमी; तब्बल 21 लहानग्या बाळांची कोरोनावर मात, 20 दिवसांच्या छकुलीनेही जिंकला लढा

एक आनंददायी बातमी; तब्बल 21 लहानग्या बाळांची कोरोनावर मात, 20 दिवसांच्या छकुलीनेही जिंकला लढा

कोविड वॉर्डमध्ये कोणी 6 महिन्यांचं...तर कोणी 20 दिवसांच होतं...मात्र अशा परिस्थितीत या बाळांनी कोरोनाविरोधातील लढा जिंकला

    इंदूर, 10 मे : रेड  झोनमधील 20 दिवसांच्या एका बाळासह 2 वर्षांपर्यंतच्या 21 बाळांनी कोविड-19 (Covid -19) शी लढा जिंकला आहे. सध्या देशभरात कोरोनाचा कहर वाढत आहे. लहान बाळांमध्ये रोगप्रतिकार शक्ती कमी असल्याने त्यांनाही कोरोनाचा धोका असतो. चांगली बाब म्हणजे इंदूरमधील तब्बल 21 बाळांनी (Baby) कोरोनाशी जोरदार लढा दिला आणि तो जिंकला. 20 दिवस, 6 महिने तर काही बाळं 7 ते 8 महिन्यांची होती. कोविड - 19 वॉर्डमध्ये या बाळांना पाहणं त्यांच्या आईबरोबरच तेथील डॉक्टरांनाही आवडत नव्हतं.डॉक्टरही आपले प्रयत्न करीत होते आणि या प्रयत्नांना अखेर यश मिळालं. स्थानिक रुग्णालयात उपचारादरम्यान दिवस-रात्र या लेकरांची आई त्यांच्यासोबत होती. शहरातील चोइथराम रुग्णालयातील वरिष्ठ शिशू रोज विषेतज्ज्ञ डॉ. रश्मी शाद यांनी रविवारी सांगितले की, गेल्या 15 दिवसांमध्ये एक 20 दिवसांचं बाळं कोविड – 19 च्या वॉर्डमध्ये दाखल झालं होतं. तिने कोरोनाशी लढा जिंकला आहे. त्यांनी सांगितले की, कोविड – 19 मधून बरी झालेली 20 दिवसांची छकुली शनिवारी घरी गेली. तिला 1 मे रोजी रुग्णालयात भरती करण्यात आले होते. शाद पुढे म्हणाल्या की, 20 दिवसांची ही मुलगी जवळील नातेवाईकांमुळे संक्रमित झाली होती. यामध्ये तिच्यासोबत असणारी तिच्या आईला कोरोनाची लागण झाली नाही ही चांगली बाब आहे. 20 दिवसांचं, 2 महिन्याचं आणि दीड वर्षांच्या बाळाला डिस्चार्ज देण्यात आला आहे, याचा आनंद आहे. शहरातील एका खासगी रुग्णालयातील श्री अरबिंदो इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सचे डॉ. रवी डोसी यांनी सांगितले की, गेल्या दीड महिन्यात आमच्या रुग्णालयात 2 वर्षांहून कमी वयाचे 18 जण कोरोनामुक्त झाले आहेत. यापैकी 8 बाळं सहा महिन्यांहून कमी वयाचे आहेत. ही बाळं आहारासाठी आपल्या आईच्या दुधावर अवलंबून होते. डोसी पुढे म्हणाले की, इतक्या लहान बाळांना कोविडच्या वॉर्डमध्ये बघून मला खूप वाईट वाटत होतं. मात्र या लहानग्यांनी कोरोना विरोधातील लढा जिंकला. याचा मला अत्यंत आनंद आहे. स्तनपान करताना आईला मास्क लावून आणि सुरक्षिततेची इतर काळजी घेतली जात होती, असेही ते म्हणाले. संबंधित -शहीद मुलाच्या आठवणीत उभारलं स्मारक; आजही त्याला पाहून आईला फुटतो मायेचा पाझर
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Corona virus in india

    पुढील बातम्या