जाहिरात
मराठी बातम्या / विदेश / कोरोना जाईना आणि दुसरा व्हायरस दार ठोठावतोय, हा देश पडलाय चिंतेत

कोरोना जाईना आणि दुसरा व्हायरस दार ठोठावतोय, हा देश पडलाय चिंतेत

कोरोना जाईना आणि दुसरा व्हायरस दार ठोठावतोय, हा देश पडलाय चिंतेत

कोरोना व्हायरसमुळे गेले अनेक देशांमध्ये आणीबाणीची परिस्थिती असून आता आणखी एका व्हायरसची भीती निर्माण झाली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मॅनिला, 18 मार्च : जगभरात कोरोनाने हाहाकार उडाला आहे. आतापर्यंत जवळपास 7 हजार लोकांचे प्राण कोरोना व्हायरसमुळे गेले असून अनेक देशांमध्ये आणीबाणीची परिस्थिती झाली आहे. त्यातच आता फिलिपाइन्मध्ये आणखी एका व्हायरसची भीती निर्माण झाली आहे. फिलिपाइन्सच्या उत्तर भागात कोरोनानंतर जीवघेण्या अशा बर्ड फ्लूने पाय पसरायला सुरुवात केली आहे. यामुळे तिथल्या सरकारची चिंता वाढली आहे. हा फ्लू एका लहान पक्ष्यामुळे पसरत चालला आहे. फिलिपाइन्सच्या कृषी मंत्र्यांनी याची माहिती दिली असून. हा संसर्गजन्य फ्लू असून H5N6 आणि इन्फ्लुएन्झा A व्हायरस गटातील आहे. हा व्हायरस पहिल्यांदा एका लहान पक्ष्यात आढळला. मानवासाठी हा व्हायरस धोकादायक आहे. कृषी मंत्र्यांनी सांगितलं की, 2017 मध्येही हा फ्लू पसरला होता. तेव्हाही लहान पक्षांमुळे व्हायरसचं संक्रमण झालं होतं. आता सुरक्षेच्या कारणास्तव फिलिपाइन्समध्ये सुरक्षेच्या कारणास्तव पक्ष्यांची वाहतूक तसंच निर्यातीवर बंदी घालण्यात आली आहे. तसंच जवळपास 12 हजार बर्ड फ्लू झालेल्या पक्षी, कोंबड्यांना मारण्यात आलं. त्यानंतर त्यांची विल्हेवाटही लावण्यात आल्याची माहिती कृषी मंत्र्यांनी दिली आहे. जिथं पक्षांचे शेड आहे तिथून आसपासच्या 7 किलोमीटर परिसरात लोकांना काळजी घेण्यास सांगण्यात आलं आहे. तसेच बचावकार्यासह आरोग्य पथकं कार्यरत आहेत. हे वाचा : कोरोनाला हरवणारा भारत बनला 5वा देश, औषधं तयार करण्यात होणार मदत सध्या जगभर कोरोनाने भीतीचं वातावरण आहे. यामुळे सर्वाधिक चीनमध्ये 3226 तर इटलीत 2158 लोकांचा प्राण गेला आहे. याशिवाय इराणमध्ये 853, स्पेनमध्ये 342, फ्रान्समध्ये 148 जणांना जीव गमवावा लागला. भारतातही कोरोनाचा शिरकाव झाला असून महाराष्ट्रात सर्वाधिक संशयित रुग्ण आढळले  आहेत. हे वाचा : कोरोना रुग्णांसाठी दिला जातोय स्पेशल आहार, ‘असा’ असतो मेन्यू

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात