कोरोना रुग्णांसाठी दिला जातोय स्पेशल आहार, 'असा' असतो मेन्यू

कोरोना रुग्णांसाठी दिला जातोय स्पेशल आहार, 'असा' असतो मेन्यू

भारतातही कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर कोरोना व्हायरसची लागण झालेल्यांसह संशयित रुग्णांना आयसोलेशन सेलमध्ये ठेवलं जात आहे.

  • Share this:

तिरुअनंतपुरम, 18 मार्च : कोरोनामुळे जगभर हाहाकार उडाला आहे. त्यातच भारतातही रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर भारत सरकारकडून आवश्यक ती सर्व काळजी घेतली जात आहे. कोरोना व्हायरसच्या संशयित रुग्णांना आयसोलेशन सेलमध्ये ठेवण्यात येतं. केरळमध्ये सरकारी वैद्यकीय महाविद्यालयाच्या हॉस्पिटलमध्ये आयसोलेशन सेल आहे. तिथं कोरोना व्हायरसच्या संशयित रुग्णांसाठी नाष्टा, दोन वेळचं जेवण आणि वाचण्यासाठी पुस्तकं पुरवण्यात येत आहेत. या आयसोलेशन सेलमध्ये 15 भारतीय रुग्ण तर दोन ब्रिटनचे नागरिक आहेत. या रुग्णांसाठी स्वतंत्र मेन्यू तयार केला जात असल्यांचं निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं.

संशयित रुग्णांना सकाळी साडेसात वाजता नाश्ता दिला जातो. यात भारतीय रुग्णांना डोसा-सांबर, दोन अंडी, दोन संत्री, चहा आणि एक लिटर पाणी दिलं जातं. तर ब्रिटनच्या रुग्णांना कांदा न घालता केलेलं ऑम्लेट, टोस्ट, सूप आणि फळांचा रस दिला जातो.

सकाळच्या नाश्त्यानंतर पुन्हा साडेदहाच्या सुमारास भारतीय रुग्णांसाठी साडेदहाच्या सुमारास फळांचा रस दिला जातो. त्यानंतर दुपारी जेवणामध्ये दोन चपाती, भात, मासे, आमटी, दही इत्यादी पदार्थांचा समावेश असतो. तर ब्रिटनच्या संशयित रुग्णांसाठी सकाळी अकरा वाजता अननसाचा रस आणि दुपारी जेवणामध्ये टोस्ट चीज, फळे इत्यांदी दिले जाते.

दुपराचे जेवण झाल्यानंतर पुन्हा साडेतीन वाजता थोडं खायला दिलं जातं. यात भारतीय रुग्णांकरीता दुपारी साडेतीनच्या सुमारास चहा-बिस्कीट, तळलेले केळ आणि वडा असे पदार्थ दिले जातात. सध्याकाळी सातच्या दरम्यान रात्रीचं जेवण दिलं जातं. यात अप्पम, शिजवलेल्या भाज्या, दोन केळी यांचा समावेश असतो. तर ब्रिटनच्या रुग्णांना सायंकाळी चार वाजता फळांचा रस दिला जातो. त्यानंतर रात्री त्यांना टोस्ट ब्रेड, अंडी आणि फळे असा आहार पुरवला जातो.

हे वाचा : कोरोनाव्हायरसचा धोका टाळण्यासाठी होम क्वारंटाइन; जाणून घ्या काय करावं, काय नाही

आतापर्यंत देशात कोरोना व्हायरसच्या संसर्गाची 145 प्रकरणं नोंदली गेली आहेत. तीन लोकांचा मृत्यू झाला आहे. देशभरात महाराष्ट्रात सर्वाधिक 41 रुग्ण आढळले आहेत. मुंबई पोलिसांनी पब, डान्स बार, डिस्को आणि तत्सम सार्वजनिक ठिकाणे 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्यास सांगितले आहे.

हे वाचा : 'या' Blood group च्या व्यक्ती 'कोरोना'च्या सर्वाधिक शिकार, धक्कादायक संशोधन

First published: March 18, 2020, 8:53 AM IST

ताज्या बातम्या