मराठी बातम्या /बातम्या /विदेश /230 दिवस शरीरात राहतो Corona Virus?, 'या' अवयवांवर करतो परिणाम; अमेरिकेत संशोधन

230 दिवस शरीरात राहतो Corona Virus?, 'या' अवयवांवर करतो परिणाम; अमेरिकेत संशोधन

प्रतीकात्मक फोटो

प्रतीकात्मक फोटो

दुसरीकडे देश आणि जगातील शास्त्रज्ञ कोरोना महामारी (Corona Pandemic)आणि या व्हायरसचे (Coronavirus) स्वरूप यावर सातत्याने संशोधन करत आहेत.

अमेरिका, 27 डिसेंबर: कोरोना व्हायरसनं (Corona Virus) संपूर्ण जगाची झोप उडवली आहे. आता कोरोना व्हायरसचा ओमायक्रॉन (Omicron) व्हेरिएंटमुळे चिंता वाढवली आहेत. त्यात दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. तर दुसरीकडे देश आणि जगातील शास्त्रज्ञ कोरोना महामारी (Corona Pandemic)आणि या व्हायरसचे (Coronavirus) स्वरूप यावर सातत्याने संशोधन करत आहेत. आता अमेरिकेत केलेल्या एका अभ्यासातून कोरोनासंदर्भातली एक नवीन माहिती समोर आली आहे.

अमेरिकेत झालेल्या एका अभ्यासात असे आढळून आलं आहे की, काही दिवसांतच कोरोना व्हायरस मानवी शरीरातील मेंदू, हृदय आणि शरीराच्या सर्व भागांमध्ये पोहचण्याची शक्यता आहे. जिथे हा व्हायरस अनेक महिने राहू शकतो. अमेरिकेच्या शास्त्रज्ञांनी (US Researchers) शरीरात आणि मेंदूमध्ये या व्हायसरचे वितरण आणि उपस्थिती यांचा व्यापक आढावा घेतला आहे.

हेही वाचा-  मुंबईत कोरोनाचं पुन्हा डोकंवर, दिवसभरात तब्बल 922 नवे रुग्ण

 यूएस नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थच्या शास्त्रज्ञांनी सांगितलं की, त्यांच्या अभ्यासात त्यांना आढळून आलं की हा व्हायरस श्वसन प्रणाली व्यतिरिक्त रोगजनक मानवी पेशींमध्ये प्रतिकृती तयार करण्यास सक्षम आहे. या अभ्यासाचे निकाल शनिवारी ऑनलाइन जाहीर करण्यात आले, जे जर्नल नेचरमध्ये प्रकाशित केले जाणार आहेत.

व्हायरस शरीरात 230 दिवस राहू शकतो

मेरीलँड येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थमध्ये हे संशोधन करण्यात आले आहे. जिथे गेल्या कोरोना महामारीत मृत्युमुखी पडलेल्या 44 लोकांच्या मृतदेहांच्या तपासणीशी संबंधित डेटाचे नमुने आणि संशोधन करण्यात आले आहे. या अभ्यासात, शास्त्रज्ञांच्या एका गटाने दावा केला आहे की SARS-Cov-2 RNA शरीराच्या अनेक भागांमध्ये राहू शकतो, ज्यामध्ये मेंदूसंबंधित सर्व भागांचा समावेश आहे, जिथे तो 230 दिवस राहू शकतो आणि संसर्ग होऊ शकतो.

व्हायरस अनेक शरीरातील अवयवांवर परिणाम करू शकतो

या अभ्यासाद्वारे या शास्त्रज्ञांनी हे समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे की हा व्हायरस शरीरात अनेक दिवस कसा राहतो. जेणेकरुन रुग्णांवर चांगले उपचार करण्यासाठी मदत होऊ शकते. असे अमेरिकेतील एका महामारी तज्ज्ञानं सांगितलं की, हा अभ्यास एक अद्भुत कार्य आहे. ज्याद्वारे हे आढळून आले आहे की कोरोना व्हायरस शरीरात राहून आपल्या अवयवांवर कसा परिणाम करतो.

दरम्यान या अभ्यासाशी संबंधित परिणाम अद्याप स्वतंत्र शास्त्रज्ञाने वाचलेले नाहीत. या अभ्यासातील बहुतांश डेटा प्राणघातक कोविड-19 प्रकरणांशी संबंधित आहे. कोरोना व्हायरसचे स्वरूप फुफ्फुसाव्यतिरिक्त इतर पेशींना संक्रमित करणं आहे, याचे पुरावे अनेक अभ्यासांमध्ये आढळून आले आहेत.

हेही वाचा-  BREAKING : मुंबईमध्ये ओमायक्रॉनचा उद्रेक, एकाच दिवसात 27 जण आढळले पॉझिटिव्ह

 नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्चच्या संशोधकांनी व्हायरसची पातळी ओळखण्यासाठी विविध प्रकारच्या टिश्यू प्रजर्वेशन संरक्षण तंत्र वापरले आहे. तसेच फुफ्फुस, हृदय आणि लहान आतड्यांमधून व्हायरसचे अनेक टिश्यू मिळवले आणि त्यांचा अभ्यास केला.

या संशोधकांचे म्हणणं आहे की, आमच्या निकालांमध्ये असे आढळून आले आहे की या व्हायरसचा सर्वाधिक परिणाम श्वसनमार्गावर आणि फुफ्फुसांवर होतो. तसंच संसर्गाच्या सुरुवातीच्या टप्प्यात हा व्हायरस शरीराच्या इतर भागांमध्ये पसरू शकतो. त्यात मेंदूचाही समावेश होतो. कोरोना व्हायरस हा एक पद्धतशीर व्हायरस आहे. ज्याचा प्रभाव काही लोकांमध्ये स्पष्टपणे दिसून येतो. मात्र काही लोकांमध्ये तो बराच काळ शरीरात राहतो आणि त्रास देतो, असं शास्त्रज्ञांना म्हणायचं आहे.

First published:
top videos

    Tags: Corona virus in india, Coronavirus