धक्कादायक! लष्कराच्या रुग्णालयातच झाडाला लटकून कोरोना पॉझिटिव्ह जवानाची आत्महत्या

धक्कादायक! लष्कराच्या रुग्णालयातच झाडाला लटकून कोरोना पॉझिटिव्ह जवानाची आत्महत्या

आजारपणाला कंटाळून जवानानं रुग्णालयातच झाडाला लटकून आत्महत्या केल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 13 मे : कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या सैन्याच्या जवानानं आत्महत्या केल्याची धक्क्दायक घटना घडली आहे. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 31 वर्षीय जवानाचा मृतदेह मंगळवारी पश्चिम दिल्लीच्या नारायण सेनेच्या बेस रुग्णालयाबाहेर झाडाला लटकलेला आढळून आला. या जवानाला कर्करोगही झाला होता, त्यामुळं त्यानं आत्महत्या केल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

पश्चिम दिल्लीचे डीसीपी दीपक पुरोहित म्हणाले की या जवानाला फुफ्फुसाचा कर्करोग होता. त्यांच्यावर उपचार केले जात होते. उपचारादरम्यान त्यांना कोरोनाचा झाल्याचे आढळून आले. त्यामुळं 5 मे रोजी त्यांना दवाखान्यात नेण्याआधी धौला कुआन येथील आर्मी रिसर्च अँड रेफरल (आरआर) हॉस्पिटलमध्ये दाखल केले.

पोलिसांना सापडली सुसाइड नोट

दीपक पुरोहित यांनी सांगितले की, मंगळवारी दुपारी 1च्या सुमारात या जवानाला कोव्हिड वॉर्डमध्ये पाहिलं होतं. सकाळी 4च्या आसपास त्यांनी झाडाला लटकून आत्महत्या केली. पोलिसांना एक सुसाइड नोटही सापडली आहे. त्यात त्यांनी आजारपणाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे सांगितलं आहे. पुरोहित म्हणाले की, 'त्यांच्या मृत्यूची माहिती कुटूंबाला देण्यात आली असून, त्याचे कुटुंब येताच पोस्टमार्टम केलं जाईल. आम्ही चौकशीची प्रक्रिया सुरू केली आहे'.

अलवरमध्ये सिग्नलमन म्हणून तैनात होता

जवान हा महाराष्ट्राचा रहिवासी होता, परंतु त्याचे कुटुंब राजस्थानातील अलवर इथं राहते. आरआर हॉस्पिटलमध्ये कर्करोगाच्या उपचारासाठी दाखल होण्यापूर्वी जवान अलवर येथे सिग्नलमन म्हणून तैनात होता. भारतीय लष्कराच्या प्रवक्त्यांनी घटना खरे असल्याचे सांगितले. प्रवक्ते म्हणाले, पोस्टमार्टम रिपोर्टची प्रतिक्षा आहे. कुटुंबास सर्व आवश्यक सहकार्य दिले जाईल'.

संबंधित-

मुंबई पोलिसांसाठी मध्यरात्री वाईट बातमी, आणखी एका पोलिसाची कोरोनाशी झुंज अपयशी

झाडावर मुलाचं शव पाहून आई हादरली; सोलापूरहून 1400 किमी अंतर पार करुन आला होता

First published: May 13, 2020, 8:48 AM IST

ताज्या बातम्या