इस्लामाबाद, 02 सप्टेंबर: हुर्रियत नेता (Separatist Movement) सय्यद अली शाह गिलानी यांचं निधन (Syed Ali Shah Geelani Death) झालं. बुधवारी रात्री गिलानी यांचं निधन झालं. मात्र गिलानी यांना श्रद्धांजली अर्पण करताना पाकिस्तानचे (Pakistan) पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan)यांनी भारताविरोधात भाष्य केलं आहे. पंतप्रधान इम्रान खान यांनी येथे गिलानी यांना ‘पाकिस्तानी’ म्हणत देशाचा झेंडा अर्धवट झुकवला. पाकिस्तानने गिलानी यांच्या मृत्यनंतर एक दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केलाय. गिलानी यांचे बुधवारी रात्री श्रीनगरमध्ये वयाच्या 92 व्या वर्षी निधन झाले. आज गिलानी यांना सुपुर्दे-ए-खाक केलं जाणार आहे. सय्यद अली शाह गिलानी दीर्घकाळापासून आजारी होते. इम्रान खान यांनी ट्विटरवरुन गिलानी यांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यांनी ट्वीटमध्ये लिहिलं की, काश्मिरी नेते सय्यद अली शाह गिलानी यांच्या निधनाची बातमी ऐकून फार दु:ख झालं. गिलानी यांनी आयुष्यभर आपल्या लोकांसाठी आणि स्वत:च्या निर्णयाच्या अधिकारासाठी लढा दिला. भारताने त्यांना तुरुंगात ठेवलं आणि अत्याचार केले. पाकिस्तानमध्ये त्यांच्या लढ्याला आम्ही सलाम करतो,” असं म्हटलं आहे.
We in Pakistan salute his courageous struggle & remember his words: "Hum Pakistani hain aur Pakistan Humara hai". The Pakistan flag will fly at half mast and we will observe a day of official mourning.
— Imran Khan (@ImranKhanPTI) September 1, 2021
दुसऱ्या ट्विटमध्ये इम्रान यांनी लिहिलं की, त्यांचेच शब्द लक्षात ठेवून बोलायचं झाल्यास, आम्ही पाकिस्तानी आहोत आणि पाकिस्तान आमचा आहे. पाकिस्तानचा ध्वज अर्धवट राहील आणि आम्ही अधिकृत शोक जाहीर करण्यात येत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भारतातील तालिबान, RJD नेत्याचं वादग्रस्त विधान 9 मार्च 1993 रोजी हुर्रियत कॉन्फरन्सचं गठण काश्मिरमधील फुटीरतावादी दलांच्या एकत्रित राजकीय व्यासपीठाच्या रुपात करण्यात आलं होतं. 91 वर्षीय गिलानी बरीच वर्षे नजरकैदेत होते. यादरम्यान त्यांची तब्येतदेखील बिघडली होती. मात्र 5 ऑगस्ट 2019 रोजी जम्मू-काश्मीरमधील 370 कलम हटविण्यात आलं. त्यानंतर काश्मीरमध्ये अनेक हालचाली पाहायला मिळत होत्या. मात्र 2020 मध्ये त्यांनी फुटीरतावादी मंच ऑल पार्टी हुर्रियत कॉन्फरन्समधून वेगळं होत असल्याची घोषणा केली होती. हा अनेकांसाठी मोठा झटका होता. यावेळी त्यांनी सांगितलं होतं की, ते ऑल पार्टी हुर्रियत कॉन्फरन्सला स्वत:पासून पूर्णपणे वेगळं करीत आहे.