मराठी बातम्या /बातम्या /देश /

RSS भारतातील तालिबान, बांगड्या विकणाऱ्यांना, पंक्चर काढणाऱ्यांना मारहाण करतात; RJD नेत्याच्या वादग्रस्त वक्तव्याचा व्हिडिओ व्हायरल

RSS भारतातील तालिबान, बांगड्या विकणाऱ्यांना, पंक्चर काढणाऱ्यांना मारहाण करतात; RJD नेत्याच्या वादग्रस्त वक्तव्याचा व्हिडिओ व्हायरल

राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) प्रदेशाध्यक्ष जगदानंद सिंह (Jagdanand Singh) यांनी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे एकच खळबळ उडाली आहे.

  • Published by:  Pooja Vichare

पाटणा, 02 सप्टेंबर: बिहारमधील (Bihar) राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) प्रदेशाध्यक्ष जगदानंद सिंह (Jagdanand Singh) यांनी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे एकच खळबळ उडाली आहे. सिंह यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (RSS)टीकास्त्र सोडलं आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा तालिबानी विचारसणीचा असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. जगदानंद सिंह यांनी आरएसएसची तुलना थेट तालिबानसोबत केल्यानं आता नवा निर्माण होण्याची शक्यता आहे.

अफगाणिस्तानमध्ये तालिबान जे काम करत आहे तेच काम भारतात RSS करत असल्याची बोचरी टीका जगदानंद यांनी केली आहे. पाटण्यातील पक्ष पक्ष कार्यालयामध्ये कार्यकर्त्यांना संबोधित करताना केलेल्या भाषणात जगदानंद यांनी हे वादग्रस्त विधान केलं आहे. या वादग्रस्त विधानाचा व्हिडिओही समोर आला आहे.

तालिबान हे नाव नसून एक संस्कृती आहे जी अफगाणिस्तानमध्ये आहे. आरएसएस हे भारतामधील तालिबानी आहेत. दोन्ही सारख्याच गोष्टी आहेत. RSS भारतातील तालिबान, बांगड्या विकणाऱ्यांना, पंक्चर काढणाऱ्यांना मारहाण करतात, असा जोरदार हल्लाबोल त्यांनी केला आहे. तसंच आपल्याला या लोकांना थांबवायला हवं. त्यांच्याविरोधात आपण पुढे येणं गरजेचं असल्याचंही त्यांनी कार्यकर्त्यांना म्हटलं आहे. जगदानंद यांच्या या वक्तव्यावरुन नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

First published:

Tags: RSS, Taliban