मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

दिवसातून 20 वेळा हात धुण्यासाठी कंपनीचा ससेमिरा; आता कर्मचाऱ्याला द्यावे लागले 44 लाख

दिवसातून 20 वेळा हात धुण्यासाठी कंपनीचा ससेमिरा; आता कर्मचाऱ्याला द्यावे लागले 44 लाख

स्वच्छतेच्या अतिरेकामुळे (Intense hygiene) एका बेकरी कर्मचाऱ्याला (Bakery worker) त्वचेचा त्रास (Skin Issue) होऊ लागल्यामुळे कंपनीला 44 लाख (44 lakh) रुपयांची नुकसान भरपाई द्यावी लागली आहे.

  • Published by:  desk news

लंडन, 8 ऑगस्ट : स्वच्छतेच्या अतिरेकामुळे (Intense hygiene) एका बेकरी कर्मचाऱ्याला (Bakery worker) त्वचेचा त्रास (Skin Issue) होऊ लागल्यामुळे कंपनीला 44 लाख (44 lakh) रुपयांची नुकसान भरपाई द्यावी लागली आहे. लंडनमधील बेकरी उत्पादने बनवणारी ही कंपनी कर्मचाऱ्यांना दिवसातून 18 ते 20 वेळा हात धुवायला लावत असे. मात्र सॅनिटायरच्या अति संपर्कामुळे त्वचेवर परिणाम होऊ चट्टे उठल्यामुळे या कामगारानं डॉक्टरांकडे धाव घेतली.

असा घडला प्रकार

लंडनमधील बेकरी प्रॉडक्टसाठी प्रसिद्ध असणाऱ्या वेस्ट यॉर्कशायर कंपनीच्या वेकफील्ड भागातील फॅक्टरीत ही घटना घडली. 59 वर्षीय सुसान रॉबिन्सन हे या बेकरीत काम करायचे. विविध उत्पादनं तयार करण्यापूर्वीच्या प्रत्येक प्रक्रियेपूर्वी त्यांना हात धुवायला सांगितले जात. चार महिन्यावर येऊन ठेपलेल्या नाताळसाठी कंपनीनं आपली उत्पादनक्षमता वाढवली आहे. त्यात लॉकडाऊनमुळे कंपनी बंद ठेवावी लागल्यामुळे उत्पादनाचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी अधिक काम केले जात आहे. यासाठी रॉबिन्सन यांना दिवसातून कमीत कमी 17 वेळा हात धुवावे लागत असल्याची बातमी स्थानिक वृत्तसंस्थांनी दिली आहे.

काही दिवसांनी हातावर चट्टे पडून त्याला खाज सुटू लागल्यामुळे रॉबिन्सन यांनी प्रोंटेफॅक्ट रुग्णालयात त्यांची तपासणी करून घेतली. त्यानंतर डॉक्टरांनी त्यावर लावण्यासाठी काही औषधं आणि क्रीम सुचवले. मात्र ती क्रीम लावून काम करायला कंपनीनं नकार दिला. यामुळे अखेर रॉबिन्सन यांनी कामगार संघटनेकडे धाव घेतली. संघटनेनं चालवलेल्या दाव्यानंतर कंपनीनं रॉबिन्सन यांना 50 हजार युरो, म्हणजेच 43,81,495 रुपये देण्याचं कबूल केलं.

हे वाचा -शोभायात्रा झाली शवयात्रा! तरुणाने हाताने उचलली High Voltage तार; एकाचा मृत्यू

कंपनीनं केलेल्या दाव्यानुसार रॉबिन्सन यांच्या त्वचेला झालेली इजा हा अपवाद आहे. प्रत्येकाला असे होत नाही. शिवाय आपल्या उत्पादनांमध्ये आपण स्वच्छतेबाबत कुठलीही तडजोड करणार नसल्याचंही कंपनीनं स्पष्ट केलं आहे.

First published:

Tags: London, Sanitizer