मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

VIDEO : शोभायात्रा झाली शवयात्रा! तरुणाने हाताने उचलली High Voltage तार; एकाचा मृत्यू, पाचजणं गंभीर

VIDEO : शोभायात्रा झाली शवयात्रा! तरुणाने हाताने उचलली High Voltage तार; एकाचा मृत्यू, पाचजणं गंभीर

या घटनेचा VIDEO समोर आला आहे. दरम्यान पाच जणांवर रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.

या घटनेचा VIDEO समोर आला आहे. दरम्यान पाच जणांवर रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.

या घटनेचा VIDEO समोर आला आहे. दरम्यान पाच जणांवर रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.

  • Published by:  Meenal Gangurde

करनाल, 8 ऑगस्ट : हरियाणाताली करनाल जिल्ह्यातील नगला मेगा गावात एक दु:खद घटना घडली आहे. येथे शिवरात्रीच्या निमित्ताने पिकअपवर निघणाऱ्या शोभा यात्रेदरम्यान एका तरुणाने  लटकलेली विजेची तार (Electric Wire) हाताने पकडली. ज्यानंतर 5 जणांना विजेचा झटका लागला. विजेच्या धक्क्यात एका तरुणाचा जागेवरच मृत्यू झाला आहे. 

तर चारजणं जखमी झाले आहे. तर एका तरुणाची प्रकृती गंभीर आहे. सर्व जखमींवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. शिवरात्रीच्या निमित्ताने गावात शोभा यात्रा काढण्यात आली होती. जेव्हा शोभायात्रा गावातून निघाली तेव्हा त्यात मोठ्या संख्येने लोक सहभागी झाले होते. अगदी वाजत गाजत ही शोभायात्रा गावातून जात होती. यावेळी एका गाडीवर डिजेचे मोठे स्पिकर ठेवण्यात आले होते. आणि या स्पीकरवर काही तरुण बसले होते. दरम्यान वर लटकलेल्या तारा हटविण्यासाठी स्पिकरवर बसलेल्या एका तरुणाने तारेला हात लावला. यादरम्यान त्याला विजेचा झटका लागला. त्यानंतर त्याच्या शेजारी बसलेला तरुणदेखील खाली कोसळला. (The young man picked up the High Voltage wire by hand One killed five seriously injured shocking video )

" isDesktop="true" id="589650" >

हे ही वाचा-सासूशी पंगा घेणं पडलं महागात; भररस्त्यात जावयाची चपलेने धुलाई, Video Viral

मिळालेल्या माहितीनुसार, सुरुवातील जेव्हा तरुणाने विजेच्या तारेला हात लावला तेव्हा त्याला विजेचा झटका लागला नाही. मात्र जेव्हा तरुणाने विजेची तार हाताने दाबून धरली तेव्हा त्याला करंट लागला आणि तो खाली कोसळला. या घटनेनंतर शोभायात्रेत खळबळ उडाली. या तरुणांना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आलं. यावेळी 5 जणांचा याचा फटका सहन करावा लागला. तर एकाचा यामध्ये मृत्यू झाला आहे.

 

First published:

Tags: Shocking viral video, Viral video.