• Home
 • »
 • News
 • »
 • videsh
 • »
 • कोरोना-प्रूफ कपड्यांचा दावा करणाऱ्या कंपनीला ऑस्ट्रेलियात 3.7 मिलियन डॉलर्सचा दंड

कोरोना-प्रूफ कपड्यांचा दावा करणाऱ्या कंपनीला ऑस्ट्रेलियात 3.7 मिलियन डॉलर्सचा दंड

एका न्यायालयाने संबंधित कंपनीला 3.7 मिलियन डॉलर्सचा (सुमारे 27.53 कोटी रुपये) दंड ठोठावला आहे.

 • Share this:
  कोरोना महामारीनंतर (Corona) लोक स्वच्छतेकडे आधीपेक्षा जास्त लक्ष देऊ लागले आहेत. त्यामुळेच कित्येक कंपन्या या संधीचा फायदा घेऊन आमचंच उत्पादन अधिक सुरक्षित असल्याचे दावे करत आहेत आणि स्वतःची जाहिरात करत आहेत. यामध्ये साबण, सॅनिटायझर (Sanitizer) अशा गोष्टींचा समावेश आहेच; मात्र अगदी पंखा, लाइट, टूथब्रश आणि इतर गोष्टीही ‘जर्म्स-फ्री’ असल्याचा दावा करत कंपन्यांनी विकण्यास सुरुवात केली होती. लॉर्ना जेन (Lorna Jane) नावाच्या कपड्यांच्या कंपनीनेही “आमच्या कंपनीने उत्पादित केलेले कपडे घातल्याने कोरोनाची लागण होत नाही” (Corona proof cloths) असा दावा आपल्या जाहिरातीत केला होता; असा खोटा दावा केल्यामुळे ऑस्ट्रेलियातल्या (Australia) एका न्यायालयाने संबंधित कंपनीला 3.7 मिलियन डॉलर्सचा (सुमारे 27.53 कोटी रुपये) दंड ठोठावला आहे. (Lorna Jane Fine) 'दैनिक भास्कर'ने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. 2020च्या डिसेंबर महिन्यात ऑस्ट्रेलियातल्या नियामक यंत्रणेने लॉर्ना जेन कंपनीविरोधात कारवाई सुरू केली होती. कंपनीच्या सहसंस्थापक लॉर्ना जेन क्लार्कसन यांच्यावर फसवणुकीचा आरोप करण्यात आला होता. यानंतर एका स्थानिक न्यायालायने कंपनीला दंड ठोठावला होता. त्या वेळी कंपनीने आपल्या ग्राहकांचं शोषण केल्याचं मत न्यााय‍धीशांनी व्यक्त केलं. कंपनीने आपल्या जाहिरातींमध्ये दिशाभूल करणाऱ्या शब्दांचा वापर करून लोकांच्या आयुष्याशी खेळ केल्याची टिप्पणी न्यायालयाने केली. लॉर्ना जेन ही कंपनी खासकरून महिलांना व्यायामावेळी वापरण्याकरिता लागणारे अॅक्टिव्हवेअर्स बनवते. ऑस्ट्रेलियामध्ये जेव्हा कोरोनाची लाट मोठ्या प्रमाणात होती, तेव्हा कंपनीने एलजे शील्ड (LJ Shield) नावाचं उत्पादन सादर केलं होतं. यासाठी वापरण्यात आलेलं कापड कोरोना विषाणूला नष्ट करू शकतं, असा दावा कंपनीने केला होता.ऑस्ट्रेलियामध्ये या ब्रँडची 108 स्टोअर्स आहेत. याव्यतिरिक्त अमेरिका आणि न्यूझीलंडमध्येही या ब्रँडची स्टोअर्स आहेत. कंपनीने आपल्यावर आरोप फेटाळून यासाठी मालाच्या पुरवठादाराला जबाबदार ठरवलं आहे. एका विश्वसनीय पुरवठादाराने आम्हाला हे उत्पादन दिलं होतं आणि त्यामध्ये हायटेक तंत्राचा वापर करण्यात आल्याचं त्यांच्याकडून सांगण्यात आलं होतं, असं कंपनीने सांगितलं. तसंच, हे कापड अँटी बॅक्टेरिअल आणि अँटी व्हायरल असल्याचा दावा या पुरवठादाराने केला होता. त्यामुळे ही बाब लोकांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतं असं आम्हाला वाटलं. म्हणूनच आम्ही तशा प्रकारची जाहिरात केली, अशी बाजू कंपनीने मांडली होती
  First published: