Home /News /videsh /

पाकिस्तानातील सिंध प्रांताचे मुख्यमंत्री सोशल मीडियावर ट्रोल; दिवाळीऐवजी दिल्या ‘या’ शुभेच्छा

पाकिस्तानातील सिंध प्रांताचे मुख्यमंत्री सोशल मीडियावर ट्रोल; दिवाळीऐवजी दिल्या ‘या’ शुभेच्छा

सैय्यद मुराद अली शाह यांनी पाकिस्तानातील हिंदू समुदायाला ‘हॅप्पी होली ’ अशी पोस्ट लिहून दिवाळीऐवजी चक्क होळीच्या (Holi) शुभेच्छा दिल्या आहेत.

इस्लामाबाद, 5 नोव्हेंबर : पाकिस्तानातील (Pakistan) सिंध प्रांताच्या (Sindh Province) मुख्यमंत्र्यांना होळी आणि दिवाळी यातला फरकच समजत नाही. आम्ही सांगत आहोत ही अफवा नाही तर त्याचा प्रत्यक्ष पुरावा उपलब्ध आहे. पाकिस्तानातील सिंध प्रांताचे मुख्यमंत्री सैय्यद मुराद अली शाह यांच्यावर सध्या जोरदार टीका होत आहे. याचं कारण म्हणजे त्यांच्या कार्यालयातून दिवाळीऐवजी होळीच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. झालं असं की, गुरुवारी सैय्यद मुराद अली शाह यांनी पाकिस्तानातील हिंदू समुदायाला ‘हॅप्पी होली ’ अशी पोस्ट लिहून दिवाळीऐवजी चक्क होळीच्या (Holi) शुभेच्छा दिल्या आहेत. या शुभेच्छांनंतर मुख्यमंत्री शाह यांच्यावर टीकेची चांगलीच झोड उठली आहे. अर्थात ही चूक लक्षात आल्यानंतर त्यांनी लगेचच सोशल मीडियावरची ही पोस्ट काढून टाकली. पण तोपर्यंत ही पोस्ट भरपूर व्हायरल झाली होती. अर्थातच त्यानंतर सोशल मीडियावर त्यांची भरपूर थट्टा करण्यात आली. गुरुवारी जगभरातील हिंदू लोकांनी लक्ष्मीपूजनाचा सण साजरा केला. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यासह सगळ्यांनी हिंदू समुदायाला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. पण सिंधच्या मुख्यमंत्र्यांच्या सोशल मीडियाच्या पेजवर (Social Media Page) मात्र अगदी वेगळीच क्रिएटीव्हीटी दाखवण्यात आली. Diwali Celebrations 2021: रोषणाई... आनंद... उत्साह! पाहा, जगभरातील दिवाळी सेलिब्रेशनचे PHOTOs या ट्वीटवर भरपूर टीका झाल्यानंतर सिंधच्या मुख्यमंत्री कार्यालयानं हे ट्वीटच काढून टाकलं. पण ट्वीटचे स्क्रीन शॉट्स तोपर्यंत भरपूर व्हायरल झाले होते. “पाकिस्तानच्या सिंध प्रांतात हिंदू समुदायाची संख्या सगळ्यात जास्त आहे. इथं हिंदू बहुसंख्य आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांना होळी आणि दिवाळी या सणांमधला फरक कळत नाही हे खरोखरच अत्यंत दु:खद आहे,” असं पाकिस्तानमधील पत्रकार मुर्तजा सोलंगी यांनी लिहीलं आहे. ट्वीट डिलिट करून नंतर दिल्या ‘या’ शुभेच्छा होळीच्या शुभेच्छा देणारी पोस्ट डिलिट केल्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयानं नंतर अल्पसंख्याकांचं कौतुक करणाऱ्या आणि दिवाळीच्या शुभेच्छा देणारं ट्वीट केलं. सिंधचे मुख्यमंत्री सैय्यद मुराद अली शाह यांनी हिंदू समुदायाला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. “दिवाळी म्हणजे आनंदाचा आणि तेजाचा सण आहे. पाकिस्तान पीपल्स पार्टीनं नेहमी अल्पसंख्याकांच्या हक्कांचं रक्षण करण्याचंच काम केलं आहे,” असं ट्वीट नंतर मुख्यमंत्री कार्यालयाकडून करण्यात आलं. 'अलीबाबा'च्या साम्राज्याला उतरती कळा; जॅक मा आणि डोनाल्ड ट्रम्प यांची भेट कारणीभूत? पण म्हणतात ना “बूंद से गई सो हौद से नहीं आती”, तसंच काहीसं मुख्यमंत्री सैय्यद मुराद अली शाह यांच्या बाबतीतही झालं. जोपर्यंत चूक सावरायला गेले तोपर्यंत सोशल मीडियानं आपली ताकद दाखवून दिली होती. सिंध प्रांतातील हिंदूंना दिवाळीऐवजी होळीच्या शुभेच्छा मिळाल्या होत्या.
First published:

Tags: Diwali 2021, Pakistan

पुढील बातम्या