वॉशिंग्टन, 8 नोव्हेंबर: सार्वजनिक ठिकाणी मानवी वागण्या-बोलण्याचे, खाण्या जेवण्याबाबतही काही संकेत ठरलेले आहेत. पाश्चात्त्य देशांमध्ये तर अशा गोष्टींबाबत फारच नियम पाळले जातात. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी शिंकणं, पादणं गे फारसं योग्य मानलं जात नाही. मात्र काही नैसर्गिक गोष्टींवर माणसाचं नियंत्रण नसतं. तरीही अशा गोष्टी घडल्या तर त्याबाबत मोठी चर्चा होते. सध्या अमेरिकेचे (USA) राष्ट्रपती ज्यो बायडेन (Joe Biden) यांच्या 'फार्ट'ची म्हणजे दीर्घ पादण्याची चर्चा सुरू आहे. इंग्लंडचे राजपुत्र प्रिन्स चार्ल्स (Prince Charles) यांच्या पत्नी कॅमिला पार्कर बाउल्स (Camilla Parker Bowels) यांची बायडेन यांच्याशी चर्चा सुरू असताना हा प्रकार घडल्यानं कॅमिला पार्कर बाउल्स यांनी त्याबाबत टिप्पणी केली आहे. न्यूयॉर्क पोस्टने याबाबतचे वृत्त दिलं आहे.
गेल्या आठवड्यात स्कॉटलंडमध्ये (Scotland) झालेल्या जागतिक हवामान बदल अर्थात सीओपी 26 (COP26) या शिखर परिषदेत जगभरातील अनेक देशांचे पंतप्रधान, राष्ट्रपती, प्रमुख मान्यवर व्यक्ती सहभागी झाल्या होत्या. यामध्ये प्रिन्स चार्ल्स, केंब्रिजचे ड्यूक आणि डचेस, डचेस ऑफ कॉर्नवॉल कॅमिला पार्कर बाउल्स आणि बोरिस जॉन्सन उपस्थित होते.
सोमवारी केल्व्हिनग्रोव्ह आर्ट गॅलरीमध्ये (Kelvingrove Art Gallery)एका कार्यक्रमादरम्यान डचेस ऑफ कॉर्नवॉल कॅमिला पार्कर बाउल्स यांची अमेरिकेचे राष्ट्रपती 79 वर्षीय जो बायडेन यांची भेट झाली. ते दोघेही चर्चा करत असताना अचानक बायडेन यांनी 'फार्ट' (Fart)केलं म्हणजे ते पादले. कॅमिला पार्कर बाउल्स यांच्या ते लक्षात आलं. त्यांनी माध्यमांनाही हा किस्सा सांगितला.
' (बायडेन यांचं पादणं) दीर्घ आणि मोठ्याने होतं त्याकडे दुर्लक्ष करणं अशक्य होतं', असं कॅमिला पार्कर बाउल्स यांनी 'द मेल'शी झालेल्या संवादात सांगितलं. बायडेन यांनी या मान्यवरांशी चाललेल्या चर्चेदरम्यान, यावर नियंत्रण ठेवणं आवश्यक होतं, पण त्यांना ते शक्य झालं नाही. त्यामुळे त्याची चांगलीच चर्चा सुरू आहे.
या हवामान बदल परिषदेतील बायडेन यांच्याविषयीच्या आणखीही काही गोष्टी माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाल्या आहेत. या परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी बायडेन उपस्थित होते. त्यावेळी एडी एनडोपू (Eddie Ndopu) या अपंगत्व हक्क कार्यकर्त्याचे (Disability Rights Activist) भाषण सुरू असताना बायडेन यांना चक्क झोप लागल्याचंही दिसून आलं.
ग्लोबल वॉर्मिंगमुळे (Global Warming) आमची अन्न पिकवण्याची आणि जगण्याची क्षमता याला धोका निर्माण झाला आहे, असा इशारा एनडोपू यांनी यावेळी दिला. हे भाषण सुरू असताना बायडेन स्वतःच्या झोपेवरही नियंत्रण ठेवू शकले नाहीत. ते चक्क पेंगत होते. काही सेकंद त्यांनी डोळे बंद केले होते. अखेर त्यांचा सहाय्यक त्यांना उठवायला आला. महासत्ता म्हणून ओळख असलेल्या अमेरिकेचे राष्ट्रपती बायडेन यांच्या या जागतिक परिषदेतील पेंगण्याचे, पादण्याचे किस्से आता जगजाहीर झाले असून, माध्यमांमधून त्याची चर्चा सुरू आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: America, Joe biden, President of america