मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

हिवाळ्यात खूप फायदेशीर ठरते लसूण खाणं, जाणून घ्या किती फायदेशीर आहे आरोग्यासाठी

हिवाळ्यात खूप फायदेशीर ठरते लसूण खाणं, जाणून घ्या किती फायदेशीर आहे आरोग्यासाठी

अनेक आजारांमध्ये लसणाचं सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. हेल्थलाईनच्या बातमीनुसार लसणात असे अनेक गुण आहेत ज्यांना आधुनिक विज्ञानानेही पुष्टी दिली आहे.

अनेक आजारांमध्ये लसणाचं सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. हेल्थलाईनच्या बातमीनुसार लसणात असे अनेक गुण आहेत ज्यांना आधुनिक विज्ञानानेही पुष्टी दिली आहे.

अनेक आजारांमध्ये लसणाचं सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. हेल्थलाईनच्या बातमीनुसार लसणात असे अनेक गुण आहेत ज्यांना आधुनिक विज्ञानानेही पुष्टी दिली आहे.

नवी दिल्ली, 08 नोव्हेंबर: आता देशात थंडी पडायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे थंडी बाधू नये, खोकला होऊ नये यासाठी काळजी घ्यायला हवी. आयुर्वेदात अनेक औषधी वनस्पतींचा उल्लेख केलेला आहे. भारतीय स्वयंपाकघरात वापरले जाणारे साधे मसालेही आपल्याला आरोग्य चांगलं राखायला मदत करतात. त्यामुळेच आपण रोजच्या भाज-आमटीमध्ये कढीपत्ता किंवा कोथिंबीरचा वापर करतो. हळद ही आपल्या मिसळण्याच्या डब्यात असतेच. हिंग, मेथी सगळंच आरोग्याला फायदेशीर असते.

असाच उपयुक्त असतो लसूण (Garlic). अनेक आजारांमध्ये लसणाचं सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. हेल्थलाईनच्या बातमीनुसार लसणात असे अनेक गुण आहेत ज्यांना आधुनिक विज्ञानानेही पुष्टी दिली आहे. लसणात असे अनेक घटक असतात ज्यांचा वापर वैद्यकीय उपचारांसाठी केला जाऊ शकतो. शास्रज्ञांच्या मते लसणात सल्फर मोठ्या प्रमाणात असतो. त्यामुळे माणसाचं अनेक आजारांपासून संरक्षण व्हायला मदत होते. लसणात सर्वांत महत्त्वाचा घटक असतो तो म्हणजे अलिसिन (allicin). आपण ताजं लसूण चिरतो तेव्हा अलिसिन बाहेर येतं. चिरल्यानंतर त्याला सोडून दिलं तर लसणातून अलिसिन निघून जातं. लसणात असलेले महत्त्वाचे घटक म्हणजे मँगेनीज, व्हिटॅमिन बी 6, व्हिटॅमिन सी, सेलेनियम आणि फायबर. लसणाचे आरोग्याला काय काय फायदे आहेत ते जाणून घेऊया.

थंडीत फायद्याचं

थंडीच्या दिवसांत लसूण खाल्लाने थंडीचा मानवी शरीरावर (Human Body) कमी परिणाम होतो. लसूण रोगप्रतिकारशक्ती वाढवतो. 12 आठवडे केलेल्या संशोधनानंतर असं लक्षात आलं की ज्यांनी लसूण खाल्ला होता त्यांना थंडीमुळे होणाऱ्या त्रासाचं प्रमाण 63 टक्क्यांनी कमी होतं. तसंच थंडीमुळे होणारा त्रास दीर्घकाळ चालला नाही म्हणजेच सामान्यपणे ज्या व्यक्तीला 5 दिवस थंडीचा त्रास व्हायचा त्या व्यक्तीने लसूण खाल्ल्यानंतर त्याला तो त्रास 1.5 दिवसच जाणवला. त्या पुढे तो त्रास त्याला जाणवला नाही. हा लसूण खाण्याचा महत्त्वाचा फायदा होता.

हेही वाचा- महिलांच्या मानेत अडकवतात धातूच्या कड्या, कारण वाचून बसेल धक्का

उच्च रक्तदाब असेल तर तो नियंत्रणात आणण्यासाठी लसूण फायदेशीर आहे. लसणातल्या अलिसिनचा रक्तदाबावर सकारात्मक परिणाम होतो. एका अभ्यासात असं लक्षात आलं आहे की उच्च रक्तदाब (High Blood Pressure) असलेल्या व्यक्तींमध्ये लसूण औषधासारखा परिणाम करतं. लसूण आणि मध एकत्र करून खाल्लं तर त्याचा परिणाम उच्च रक्तदाबाच्या व्यक्तीला लवकर आराम मिळण्यात होतो.

वजन नियंत्रणालाही लसूण खाणं फायद्याचं ठरतं. लसणातल्या पोषकद्रव्यांमुळे शरीरातली कॅलरी जळतात (Calorie Burning) त्यामुळे वजन कमी व्हायला मदत होते. वजन कमी करण्यासाठी अनुषापोटी कच्चा लसूण खा. त्यामुळे वेगाने वजन कमी करायला मदत होईल.

हेही वाचा-  Vastu Tips : सूर्यास्तानंतर ही 9 कामं करणं अशुभ मानलं जातं; घरावर येऊ शकतं संकट, वाईट बातमी

 डायबेटिसच्या रुग्णांनी लसूण खाणं त्यांच्या हिताचं असतं. लसूण रक्तातली ग्लुकोजची पातळी नियंत्रणात ठेवतं. उंदरांवर केलेल्या प्रयोगांच्या आधारे अनेक गोष्टी सिद्ध झाल्या आहेत. लसूण खाल्ल्यानी महिलांमध्ये असलेल्या इस्टोजन हॉर्मोन बळकट होतं त्यामुळे महिलांची हाडं कमी झिजतात. त्याचबरोबर दातांच्या आरोग्यासाठीही लसूण फायद्याचा आहे. अँटिबॅक्टेरियल असल्याने लसणाचा उपयोग दात किडण्यापासून रोखण्यासाठी होतो.

First published:

Tags: Health Tips