मराठी बातम्या /बातम्या /विदेश /आपण कोरोनाग्रस्त नाही; सिद्ध करू न शकणाऱ्या वृद्धाला तब्बल 965 किमी पायी चालावं लागलं

आपण कोरोनाग्रस्त नाही; सिद्ध करू न शकणाऱ्या वृद्धाला तब्बल 965 किमी पायी चालावं लागलं

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

जवळपास 15 दिवस ही व्यक्ती चालत होती.

    बीजिंग, 23 जून : बहुतेक देशांनी लॉकडाऊन शिथील केला आहे, काही सार्वजनिक ठिकाणं, सार्वजनिक वाहतूक खुली करण्यात आली आहे. मात्र कोरोनाचा प्रसार होऊ नये, यासाठी आवश्यक ती खबरदारी घेतली जाते. त्यामुळे लॉकडाऊन शिथील केल्यानंतर सार्वजनिक ठिकाणी गेल्यानंतर किंवा सार्वजनिक वाहतूक करताना आपल्याला कोरोना नाही हे दाखवावं लागतं. आता हे कसं दाखणावर तर बहुतेक देशांनी मोबाइल अ‍ॅप तयार केलेत. ज्यामार्फत आपल्याला आणि आपल्या परिसरातील नागरिकांना कोरोनाव्हायरस तर नाही ना याचं निदान होतं.

    मात्र एखाद्याकडे स्मार्टफोन नसेल आणि तो आपण कोरोनाग्रस्त नाही हे सिद्ध करू शकला नाही तर... चीनमध्ये तर अशा वृद्ध व्यक्तीला तब्बल 965 किलोमीटर पायी चालावं लागलं. जी असं या व्यक्तीचं नाव आहे. त्यांनी पूर्व चीनमधील अनहुई प्रांतातून झिजियांगपर्यंतचं अंतर पायी गाठलं. जवळपास 15 दिवस ते चालले.

    हे वाचा - एका झटक्यात प्यायला 10 बिअर, अशी झाली ब्लॅडरची अवस्था; X-ray पाहून व्हाल हैराण

    डेली मेलच्या रिपोर्टनुसार जी सार्वजनिक वाहतुकीने प्रावस करायला गेले. मात्र त्यांच्याकडे स्मार्टफोन नाही. त्यामुळे आपल्याला कोरोनाव्हायरस नाही हे ते सिद्ध करू शकले नाहीत. त्यामुळे त्यांना सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करून देण्यास मनाई करण्यात आली.

    शेवटी पायीच प्रवास करण्याची वेळ त्यांच्यावर ओढावली. का ट्रक डायव्हरने त्यांना पाहिलं. त्याने त्यांना खायला दिलं आणि आपल्या घरी राहण्यास सांगितलं. मात्र जी यांनी पार्कमध्येच राहणं पसंत केलं. ही बातमी सर्वत्र पसरली. जी यांच्या कुटुंबाला जेव्हा याची माहिती झाली तेव्हा ते जी यांना आणण्यासाठी त्यांनी पोलीस स्टेशन गाठलं.

    हे वाचा - डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतीयांना झटका, H1-B व्हिजाबाबत घेतला मोठा निर्णय

    भारतात ज्याप्रमाणे आरोग्य सेतू अ‍ॅप आहे. तसंच हेल्थ अॅप चीनमध्येही आहे. जेणेकरून कोरोनाव्हायरसची लागण झालेल्या व्यक्तीचं निदान होऊ शकेल. चीनमधील प्रत्येक नागरिकाच्या मोबाइलमध्ये हे अॅप असणं बंधनकारक आहे. या अंतर्गत प्रत्येकाला हेल्थ कोड देण्यात आला आहे. सार्वजनिक ठिकाणं किंवा सार्वजनिक वाहतूक करताना हा कोड दाखवावा लागतो. जर नागरिकांनी ते दाखवलं नाही, आपल्याला कोरोनाव्हायरस नाही हे ते सिद्ध करू शकले नाही तर त्यांना सार्वजनिक ठिकाणी जाता येत नाही.

    संकलन, संपादन - प्रिया लाड

    First published:
    top videos

      Tags: China, Coronavirus